घरदेश-विदेशनॅशनल हेराल्ड केस; राहुल गांधींच्या समर्थनार्थ रॅलीवर बंदी

नॅशनल हेराल्ड केस; राहुल गांधींच्या समर्थनार्थ रॅलीवर बंदी

Subscribe

राहुल गांधींप्रमाणे सोनिया गांधी यांनाही ईडीने समन्स बजावला आहे. पण कोरोनाची लागण झाल्याने सोनिया गांधी ईडीसमोर हजर राहू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांनीही ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ वाढवून मागितला आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आज अंमलबजावणी संचालनालयासमोर अर्थात ईडीसमोर हजर राहणार आहेत. सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी ते ईडीसमोर आपला जबाब नोंदवणार आहेत. मात्र काँग्रेसकडून ईडीच्या या कारवायांचे राजकीय लढाईत रुपांतर करण्याची तयारी सुरु आहे. ईडी कारवायांविरोधात काँग्रेस नेते आज काँग्रेस मुख्यालयापासून एपीजे अब्दुल कलाम रोडवरील ईडी मुख्यालयापर्यंत रॅली काढणार होते. मात्र दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या रॅलीला परवानगी नाकारली आहे. दिल्ली पोलिसांकडून रॅलीला परवानगी न देण्यामागे कायदा व सुव्यवस्थेचे कारण सांगितले जात आहे. दरम्यान दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (National Herald Case)

राहुल गांधींच्या ईडी चौकशीपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर निदर्शने केली. या कार्यकर्त्यांना आता पोलिसांकडून ताब्यात घेतले जात आहे. राहुल गांधींना ईडीने 2 जूनला चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र परदेशात असल्यामुळे राहुल गांधींनी ईडीकडे वेळ मागवून घेतला, त्यानंतर राहुल गांधींना 13 जूनला हजर राहणार आहे. दरम्यान सोनिया गांधी यांनाही ईडीने समन्स बजावला आहे. पण कोरोनाची लागण झाल्याने त्या ईडीसमोर हजर राहू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांनीही ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ वाढवून मागितला आहे.

- Advertisement -

राहुल गांधी आणि सोनिया गांधींना पाठवलेल्या समन्सविरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीत मोर्चा काढणार होते. काँग्रेस खासदार आणि काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) सदस्यही रॅलीसाठी दिल्लीत हजर राहणार आहे. यासोबतच राजस्थान या दोन्ही काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही या शक्तिप्रदर्शनात सहभागी होणार होते. मात्र दिल्ली पोलिसांनी मार्चाला परवानगी नाकारली आहे.

त्यामुळे राहुल गांधींसोबत काँग्रेस नेते-कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयाकडे मोर्चा काढण्यास परवानगी नसेल. विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्र सरकारकडून राजकीय सूडबुद्धी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. (money laundering case)

- Advertisement -

नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय?

‘नॅशनल हेराल्ड‘ हे वर्तमानपत्र पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुरू केलं होतं. हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं. मात्र 2012 मध्ये सोनिया आणि राहुल गांधींच्या ‘यंग इंडिया’ या कंपनीनं या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतलं. मात्र हे वृत्तपत्र पुन्हा सुरू करण्यात आलं नव्हतं. हे हक्क घेताना 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. (national herald case rahul gandhi appearance before enforcement directorate delhi police bans party rally)

त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा हिस्सा आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. पटियाला हाऊस न्यायालयानं राहुल आणि सोनिया यांना फसवणूक आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. यंग इंडियाने फक्त 50 लाख रुपयांच्या बदल्यात असोसिएट जर्नल्सचे मालकी हक्क मिळवल्याचा आरोप सोनिया आणि राहुल यांच्यावर करण्यात आला होता.


पंतप्रधान मोदींचा देहू दौरा; मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -