घरदेश-विदेशCoronaVirus: जास्त जवळ येऊ नका, कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावतो!

CoronaVirus: जास्त जवळ येऊ नका, कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावतो!

Subscribe

कोरोना संसर्गाच्या बहुतेक केसेस या अधिक जवळ आल्याने तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने समोर आल्या आहेत

कोरोना संसर्गाच्या बहुतेक केसेस या अधिक जवळ आल्याने तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने समोर आल्या आहेत. हा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी, शारीरिक अंतर आणि स्वच्छता यासारख्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे पुन्हा सोमवारी इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सांगितले.

देशातील इटालियन पर्यटकांमध्ये कोरोना संसर्गा संदर्भात अभ्यासाचे निष्कर्ष सांगत आयसीएमआरने म्हटले की, जवळपासच्या लोकांशी संपर्क असणाऱ्या लोकांमध्ये कोरोना संसर्गाची अधिक प्रकरणं आढळली आहेत. अशा परिस्थितीत, जवळच्या नातेवाईकांची भेट टाळणे, त्यांची कोरोना टेस्ट करणे आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवल्याने कम्युनिटी ट्रान्समिशन टाळण्यासाठी फार महत्वाचे आहे.

- Advertisement -

भारतात सुरुवातीला मार्च-एप्रिल दरम्यान १६ इटालियन पर्यटकांमध्ये आणि भारतीय कोरोना संसर्ग झालेल्या लोकांवर सविस्तर अभ्यास करण्यात आला. त्यानंतर आयसीएमआरचा हा अभ्यास इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रसिद्ध झाला आहे. आयसीएमआरने नमूद केले की, बरेच कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रूग्णांमध्ये कोणतीच कोरोनाची लक्षणं आढळली नाहित. यावेळी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कोरोनाचा प्रसार थांबविण्यात सर्वात महत्वाचा आहे.

स्वाइन फ्लूचा धडा घेत सरकारची खबरदारी

आयसीएमआरने म्हटले की, २००९ मध्ये आलेल्या स्वाइन फ्लूचा धडा घेत सरकारने यावेळेस इंटेलिजेंट टेस्टिंग स्ट्रॅटेजी स्वीकारली आणि सर्व देशभर पसरणाऱ्या कोविड -१९ या साथीच्या आजारांविरूद्धच्या लढाईत आपली तयारी अधिक बळकट केली. आज देशातील ४३२ सरकारी आणि १७८ खासगी प्रयोगशाळांमध्ये दररोज १.१ लाख नमुन्यांची चाचणी घेतली जात आहे.


कोरोनानंतरही सेक्सचा धोका कायम…त्यामुळे ‘ही’ काळजी नक्की घ्या‍!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -