घरCORONA UPDATEरेल्वेने प्रवास करताय? तर 'हे' अॅप तुमच्या मोबाईलमध्ये असणं बंधनकारक आहे!

रेल्वेने प्रवास करताय? तर ‘हे’ अॅप तुमच्या मोबाईलमध्ये असणं बंधनकारक आहे!

Subscribe

रात्री उशीरा ट्वीटकरून रेल्वे मंत्रालयाने हे अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.

लॉकडाऊनमध्ये लांबपल्ल्याच्या गाड्यांना परवानगी देण्यात आली आहे. मंगळवारपासून मुंबई ते नवी दिल्ली अशी राजधानी एक्सप्रेस धावणार आहे. मात्र यावेळी रेल्वेकडून आरोग्य सेतू अॅप प्रत्येकाककडे असणं अनिवार्य केलं आहे. सोमवारी या विशेष ट्रेनमध्ये प्रवाश्यांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. ज्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होत नाही अशा प्रवाशांना रेल्वेकडून कोणतीही जबरदस्ती करण्यात आलेली नाही.

दिल्ली आणि देशातील मोठ्या शहरांमधून जाणाऱ्या या विशेष ट्रेनसाठी सांगण्यात आलेल्या  मार्गदर्शक सूचनांमध्ये या विषयी माहिती देण्यात आली नव्हती. मात्र रात्री उशीरा ट्वीटकरून रेल्वे मंत्रालयाने हे अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘प्रवाश्यांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांच्या मोबाइल फोनवर आरोग्य सेतु अॅप डाउनलोड करणे बंधनकारक आहे. रेल्वे प्रवक्ते आरडी बाजपेयी म्हणाले की अॅप प्रवासासाठी अनिवार्य आहे. ऑनलाईन तिकिटे बुक करण्यासाठी मोबाइल फोन नंबर देखील अनिवार्य आहे, त्यामुळे सर्व प्रवाशांना आपल्याबरोबर मोबाईल घेऊन जावे लागणार आहे.

आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड केल्यानंतरच प्रवाशांना स्टेशनवर यावे लागणार आहे. प्रवासासाठी हे अनिवार्य आहे.  रेल्वेने ते अनिवार्य केले असून प्रवाश्यांनी स्वत: च्या सुरक्षिततेसाठी हे केले पाहिजे. सर्व प्रवाश्यांकडे मोबाइल फोन असल्याने ही समस्या येणार नाही. याव्यतिरिक्त,  आम्ही प्रवाशांना अ‍ॅप वापरण्यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य रेल्वे करणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – लॉकडाऊन किस्सा: ‘वरा’कडील ४० नातेवाईकांचा, ४८ दिवस ‘वधू’कडे मुक्काम, खर्चकरून वधूचे वडिल हैराण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -