घरताज्या घडामोडीगरिबीने काय वेळ आणली! सुवर्णपदक विजेत्या विमलाला विकावी लागतीय देशी दारू

गरिबीने काय वेळ आणली! सुवर्णपदक विजेत्या विमलाला विकावी लागतीय देशी दारू

Subscribe

जेव्हा कोणी एखादी व्यक्ती खेळात पदक जिंकते तेव्हा सर्वात जास्त आनंद आजूबाजूच्या परिसरातील लोकांना जास्त होता. कारण उद्या त्याच्या मुलाने काही तरी वेगळा विचार करून खेळात आपली आवड निर्माण करावी आणि त्याने देखील अशाप्रकारे सुवर्ण पदक जिंकावे, अशी लोकांमध्ये आशा निर्माण होते. अशाचे प्रकारे झारखंडमधल्या विमला मुंडाने कराटेमध्ये सुवर्ण पदत जिंकून आपल्या परिसरात आपले नाव रोशन केले आहे. परंतु आताची परिस्थितीत इतकी वाईट असल्यामुळे तिला कुटुंबाच्या पोटासाठी देसी दारू विकण्याची वेळ आहे.

२०११ मधील ३४व्या राष्ट्रीय खेलो मध्ये रौप्य पदक जिंकले होते. आता ती सरकारकडून नोकरी मिळले याची वाटत पाहत आहे. आतापर्यंत ती देसी दारू विकण्याचे काम करत आहे. कुटुंब इतके गरिबी असूनही तिने खेळण्याची आवड जोपासली. आपल्या राज्यासाठी पदक जिंकली. पण अजूनही सरकारने तिला नोकरी दिली नाही.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या दरम्यान अनेक कराटे खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास सुरू केले. परंतु नंतरला काही दिवसांनी हे देखील बंद करावे लागले. त्यानंतर कुटुंबासाठी तिला तांदळाची बिअर विकणे भाग पडले. तिने वाणिज्य शाखेत पदवी घेतली. सध्या ती रांचीमध्ये कांके ब्लॉकमध्ये पतरा गोंडामध्ये आपल्या नानासोबत राहत आहे.

- Advertisement -

दरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विमला मुंडाची खराब आर्थिक स्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी खेल सचिव यांना विमलाला कोणत्या प्रकारची मदद करण्याचे निर्देश दिले आहे. एवढंच नाही तर आगामी क्रीडा धोरण राबविल्यास खेळाडूंचे भविष्य बदलेल. याबाबत देखील ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -