घरताज्या घडामोडीउपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकासाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड आज भरणार उमेदवारी अर्ज

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकासाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड आज भरणार उमेदवारी अर्ज

Subscribe

एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखड आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. येत्या ६ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांना एनडीए-भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखड आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. येत्या ६ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांना एनडीए-भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखड यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. (national nda candidate jagdeep dhankhar to file nomination for vice presidential election)

एनडीए उमेदवार जगदीप धनखड आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीत शाह यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, धनखड यांच्या जमिनीवरील समस्या समजून घेतल्याने आणि संविधानिक ज्ञानाचा देशाला मोठा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धनखडजींचे जीवन लोकांच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित होते. दरम्यान, धनखड यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली.

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी रविवारी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार धनखड यांच्या माफक पार्श्वभूमीचा हवाला देत विरोधी पक्षांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. नड्डा यांनी धनखड यांच्या कृषी पार्श्वभूमीवर आणि हा टप्पा गाठण्यासाठी केलेल्या मेहनतीवर भर देत त्यांचे वर्णन ‘शेतकऱ्यांचा मुलगा’ असे केले.

- Advertisement -

तीन दशके विविध पदांवर देशाची सेवा

धनखड हे मागील तीन दशके विविध पदांवर देशाची सेवा करत असून त्यांनी एक यशस्वी प्रशासक आणि सक्षम राजकारणी असल्याचे सिद्ध केले आहे. धनखड यांच्या जीवनात नवीन भारताची भावना दिसून येते कारण त्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी अनेक सामाजिक आणि आर्थिक अडथळे पार केले आहेत.

रविवारी वेगवेगळ्या प्रदेशातील शेतकऱ्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा सत्कार केला आणि धनखड यांना एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.

विरोधकांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीची घोषणा केली. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर शरद पवारांनी मार्गारेट अल्वांना उमेदवारी दिल्याची घोषणा केली. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरीता मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारी अर्ज मंगळवारी भरणार असल्याची घोषणाही यावेळी शरद पवार यांनी केली. दरम्यान, यावेळी सर्व विरोध पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.


हेही वाचा – आजपासून संसदेच पावसाळी अधिवेशन; अग्निपथसह अनेक मुद्द्यावरून विरोधक होणार आक्रमक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -