सपा नेते आझम खान निर्दोष मुक्त; अपात्रतेचे काय होणार?

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची बुधवारी 2019 च्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल त्यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये याच प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं.

National news Azam Khan hate Speech case BJP MLA Rampur court samajwadi Party leader
National news Azam Khan hate Speech case BJP MLA Rampur court samajwadi Party leader

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची बुधवारी 2019 च्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल त्यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये याच प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं.( National news Azam Khan hate Speech case BJP MLA Rampur coourt samajwadi Party leader )

हेटस्पीचप्रकरणी आता आझम खान यांनी मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी रामपूरच्या विशेष खासदार/आमदार न्यायालयाने आझम खान यांची निर्दोष मुक्तता केली. खासदार/आमदार न्यायालयाच्या कनिष्ठ न्यायालयाने याप्रकरणी आझम यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षेनंतर त्यांची आमदारकी गेली होती. त्यानंतर या जागेवर पोटनिवडणूक झाली, त्यात आझम त्यांच्यावर गुन्हा दाखल करणारे भाजप नेते आमदार म्हणून निवडून आले.

वकील जुबेर अहमद यांनी सांगितले की, आझम खान यांना खासदार/आमदार न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. कनिष्ठ न्यायालयाने ज्या पुराव्याच्या आधारे शिक्षा सुनावली होती, ते पुरावे फेटाळून लावत वरच्या न्यायालयाने तब्बल 7 महिन्यांनंतर आझम यांची निर्दोष मुक्तता केली.

नेमकं प्रकरण काय?

आझम खान यांना 27 ऑक्टोबर 2022 रोजी हेट स्पीचप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाने आझम यांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. ही बाब 2019 ची आहे. तेव्हा देशात लोकसभेच्या निवडणुका होत होत्या.

त्यावेळी एका निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी सपा नेते आझम खान रामपूरच्या मिलक विधानसभा मतदारसंङात पोहोचले होते. सभेच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. आझम खान यांनी निवडणूक सभेत आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक टिप्पणी केल्याचा आरोप आहे. त्यावर विरोधी पक्षांनी गदारोळ केला.

( हेही वाचा: जितेंद्र आव्हाडांच्या अडचणींत वाढ; पोलिसांनी दाखल केलं 500 पानी आरोपपत्र )

दरम्यान, त्यांच्याविरोधात भाजप नेते आकाश सक्सेना यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावर कारवाई करत पोलिसांनी आझम खान यांच्याविरुद्ध मिलक कोतवाली येथे आचारसंहितेचा भंग आणि प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर हे प्रकरण रामपूरच्या खासदार- आमदार न्यायालयात पोहोचले.