घरताज्या घडामोडीवादग्रस्त वक्तव्य प्रकरण : नुपूर शर्माला जेल की बेल? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : नुपूर शर्माला जेल की बेल? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Subscribe

प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जेबी पार्दीवाला यांच्या खंडपीठासमोर नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या राज्यांमध्ये दाखल करण्यात आलेले खटले दिल्लीला हस्तांतरित करण्याचा विचार करू शकतात.

नुपूर शर्मा यांच्या वकिलाने सर्व प्रकरणं दिल्लीला हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. 19 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने नुपूर शर्मा यांच्या अटकेला 10 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली होती.

- Advertisement -

नुपूर शर्माला जेल की बेल?

मागील सुनावणीत नुपूर शर्मांना दिलासा देताना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनाही नोटीस बजावली आहे. नुपूर शर्मा यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश कोर्टाने दिले होते. सुनावणीदरम्यान नुपूर शर्मांची बाजू मांडणारे वकील मनिंदर सिंग यांनी सांगितले की, त्यांच्या जीवाला गंभीर धोका आहे.

- Advertisement -

नुपूर शर्मांचा जीव धोक्यात

नुपूर शर्मा यांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी कोर्टात सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना अराजक घटकांकडून जीवाला धोका असल्याचे नुपूरचे म्हणणे आहे. अटकेपासून सुटका व्हावी, यासाठी त्यांनी कोर्टाकडे दिलासाही मागितला होता. आपल्या याचिकेत त्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये नोंदवलेल्या ९ एफआयआर एकाच ठिकाणी हस्तांतरित करण्याची मागणीही केली होती.

या प्रकरणी सुनावणीदरम्यान नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टानेही फटकारलं आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जेबी पार्दीवाला यांच्या खंडपीठाने त्यांच्या आक्षेपार्ह विधानाला फटकारलं होतं. तुम्हाला अशा प्रकारची वक्तव्यं करण्याची काय गरज होती?, असा सवाल देखील सुप्रीम कोर्टाने त्यांना विचारला होता.

प्रेषित मुहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. एका टीव्ही चॅनलवरील चर्चेदरम्यान त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याविरोधात अनेक ठिकाणी निदर्शनं देखील करण्यात आली. त्यानंतर भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. यावेळी नुपूर शर्मा यांच्यावर विविध राज्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते.


हेही वाचा : देशात 24 तासांत 16 हजार 47 कोरोनाबाधितांची नोंद, तर रुग्णांमध्ये 25.8 टक्क्यांनी वाढ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -