घरताज्या घडामोडी'या' टेलरला सलाम; दिव्यांग असूनही दिवसरात्र एक करून शिवले मास्क

‘या’ टेलरला सलाम; दिव्यांग असूनही दिवसरात्र एक करून शिवले मास्क

Subscribe

दिव्यांग असून देखील आर्थिक परिस्थिती नसताना नागरिकांकरता या टेलरने मास्क शिवून मोफत वाटले आहेत.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून या महामारीचे देशावर संकट आले आहे. तसेच या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता प्रत्येकांनी तोंडाला मास्क लावणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, सध्या बाजारात मास्क मिळत नसल्याने रुमाल आणि कापड लावण्याची वेळ उत्तर प्रदेश मधील बिजनौर शहरावर आली आहे. मात्र, या परिस्थितून जाणाऱ्या नागरिकांसाठी एक टेलर धावून आले आहे. या टेलरने दिव्यांग असून देखील त्यांनी नागरिकांसाठी मास्क शिवायला घेतले आहेत.

आर्थिक परिस्थिती बेताची

बिजनौर शहरातील सालमाबाद गावात राहणारे जगदीश हे टेलर दिव्यांग आहे. तसेच त्यांची आर्थिक परिस्थीती देखील बेताची आहे. त्यामुळे ते कपडे शिवण्याचे काम करुन स्वत:चे आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरतात. पण, सध्या बाजारात नागरिकांना मास्क मिळत नसल्याने जगदीश यांनी मास्क शिवून लोकांना द्यायचे, असे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी आपले कपडे शिवण्याचे काम बंद करुन ते सध्या आपल्याकडे असलेल्या कापडापासून मास्क शिवत आहेत. विशेष म्हणजे ते लोकांना हे मास्क मोफत देत आहेत. तसेच आता मास्कची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आता कापड आणि प्लास्टिक अपूरे पडत आहेत.

- Advertisement -

१५० मास्क वाटले

दरम्यान, गावातील प्रमुख पवन कुमार यांनी जगदीश यांच्या मदतीकरता ‘सारथी हम’ या सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. त्यांनी या संस्थेला जगदीश यांच्या कामाबद्दल सांगितले. त्या संस्थेने देखील जगदीश यांची मदत करण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी जगदीश यांना मास्क करता लागणारे सर्व सामान दिले. त्यानंतर जगदीश यांनी आपले कापडे शिवण्याचे काम बंद करुन दिवस – रात्र एक करुन मास्क बनवले. जगदीश यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आतापर्यंत तब्बल १५० मास्क तयार करुन मोफत वाटले आहेत. दरम्यान, सारथी हम या संस्थेचे अध्यक्ष डॉ. द्विपेंद्र सिंह यांनी जगदीश यांचे कौतुक केले आहे.


हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले दिवे लावण्यास, त्यावर सेलिब्रेटी म्हणतात…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -