घरताज्या घडामोडीराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा व्हर्च्युअल पद्धतीने पार पडणार

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा व्हर्च्युअल पद्धतीने पार पडणार

Subscribe

संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे या कोरोना महामारीमुळे अनेक पुरस्कार सोहळे रद्द केले आहेत. पण राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा एक विशिष्ट पद्धतीने म्हणजचे व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित केला जाईल. सन्मानितांना ट्रॉफी आणि ड्रेससह या पुरस्कारांसाठी साई सेंटरमध्ये बोलवले जाईल. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनातून प्रमाणपत्र देतील. २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन दिवशी हा पुरस्कार सोहळा पार जाईल, याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शवर होणार आहे.

माहितीनुसार, हा सोहळा कसा आयोजित केला जाईल यासाठी क्रीडा मंत्रालय आणि दूरदर्शनच्या उच्चअधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी बैठक झाली. नामांकित ६२ खेळाडूंची नावे क्रीडमंत्री किरेन रिजिजू यांनी आजपर्यंत मंजूर करणे अपेक्षित आहे. दरम्यान खेळाडूंच्या ड्रेसचे माप विचारून ते शिवण्याची ऑर्डर देण्यात आले आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत १६ साई सेंटर हे खेळाडूंना बोलवण्यासाठी निवडण्यात आले आहे. या सेंटरमध्ये आता देण्यात येणारी ट्रॉफी आणि पदके खेळाडूंना देण्यात येणार आहे. तसेच ड्रेस घरी पाठवले जाऊ शकतात. यारम्यान खेळाडू प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारतील. हा सोहळा आतापर्यंत जसा झाला आहे, तशाच प्रकारे यंदा देखील पार पडणार आहे. पण या सोहळ्यात लोक नसतील. मंत्रालय आणि साईचे अधिकारी दिल्लीत एका अन्य सभागृहात बसतील. सर्वत्र दूरदर्शनचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. राष्ट्रपतींकडे खेळाडूंना देण्यात येणार प्रमाणपत्र असेल.

भारतीय संघाचे क्रिकटेपटू रोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार कसा द्यायचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण सोहळ्याच्या दरम्यान दोन्हीपण क्रिकेटर आईपीएलच्या तयारीसाठी युएईमध्ये असतील. अशा परिस्थितीत दोघेही साई सेंटरमध्ये पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे या दोघांना सोहळ्यात कसे सहभागी केले जाईल यावर सध्या चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IPL चा तेरावा हंगाम रंगणार Dream 11 च्या टायटलखाली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -