चेन्नई: नव्या भगव्या रंगात रंगलेली वंदे भारत एक्स्प्रेस येत्या शनिवारी १९ ऑक्टोबरला पाहायला मिळणार असल्याचे वृत्त आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत एक्स्प्रेसच्या या नव्या रंगाबद्दल आधीच सांगितले होते. तसेच, तो ‘तिरंग्या’वर आधारित असणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. (National Story Vande Bharat Train new colour IRCTC Ticket booking rail route Ashwini Vaishnaw)
आतापर्यंत भारतात वंदे भारत गाड्यांच्या २५ जोड्या आहेत. यापैकी १८ सन २०२३ मध्येच लॉन्च करण्यात आले आहेत. पहिल्या वंदे एक्सप्रेस ट्रेनला 15 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. येथे 1955 मध्ये सुरू झालेल्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये 70 हजाराहून अधिक डबे तयार झाले आहेत.
Debuting in a tangerine theme, the new #VandeBharat train makes its first public appearance before the trial run. pic.twitter.com/P0RjscLUhu
— Ministry of Railways (@RailMinIndia) August 20, 2023