घरताज्या घडामोडी'त्या' प्रकरणी राहुल गांधींची गुजरात उच्च न्यायालयात धाव

‘त्या’ प्रकरणी राहुल गांधींची गुजरात उच्च न्यायालयात धाव

Subscribe

रत सत्र न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आमदार पूर्णेश मोदी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचे अपील फेटाळून लावले.

सुरत सत्र न्यायालयाने (Surat Sessions Court) त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती फेटाळल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुजरात उच्च न्यायालयात (High Court of Gujarat) धाव घेतली आहे. (national stuck in the modi surname controversy rahul gandhi approached the gujarat high court application was rejected)

सुरत सत्र न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आमदार पूर्णेश मोदी (BJP MLA Purnesh Modi) यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात (criminal defamation case) न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचे अपील फेटाळून लावले.

- Advertisement -

अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. मोगेरा यांच्या न्यायालयाने सांगितले होते की, अपीलकर्त्याने दोषसिद्धीच्या विरोधात स्थगिती मंजूर करण्यासाठी हा खटला एक दुर्मिळ आणि अपवादात्मक खटला आहे यावर न्यायालयाची स्थापना करणे आणि त्याचे समाधान करणे आवश्यक आहे. त्यात “निर्णयाच्या विरोधात स्थगिती न दिल्यास अन्याय आणि अपूरणीय हानीसाठी अपरिवर्तनीय परिणाम व्हायला हवे आणि संशयास्पद दोषांशिवाय कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती असू नये”, असेही म्हटले आहे.

याचप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्याबद्दलची नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना जामीनही दिला होता. तसेच राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती. मात्र, त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं. सचिवालयाने तसे नोटिफिकेशन्स काढले. राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019मध्ये कर्नाटकाच्या कोलार येथे प्रचंड जाहीर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. या रॅलीत त्यांनी मोदींची तुलना थेट नीरव मोदी आणि ललित मोदी यांच्याशी केली होती. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी सर्वांची आडनावे एक समान कशी? सर्व चोरांची नावे मोदी का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता.


हेही वाचा – आता ‘दिघा’ नाही ‘दिघे’ रेल्वे स्थानक; नाव बदलल्याने राजकीय वाद वाढला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -