घरताज्या घडामोडीआसाममध्ये ११ दहशतवाद्यांना अटक, जिहादी मॉड्युलचा पर्दाफाश

आसाममध्ये ११ दहशतवाद्यांना अटक, जिहादी मॉड्युलचा पर्दाफाश

Subscribe

ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये राज्यातील एक मदरसा शिक्षकही आहे. पकडले गेलेले 'इस्लामिक कट्टरतावाद'शी संबंधित असल्याचं सांगण्यात येतंय.

आसाम या ईशान्येकडील राज्यात दहशतवादाविरोधी मोठी कारवाई झाली आहे. या कारवाईत भारतीय उपखंडातील अल-कायदा आणि भारतीय उपखंडातील बांगलादेशस्थित अन्सारुल्ला बांगला टीम (ABT) या जागतिक दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये राज्यातील एक मदरसा शिक्षकही आहे. पकडले गेलेले ‘इस्लामिक कट्टरतावाद’शी संबंधित असल्याचं सांगण्यात येतंय. (National terror module in assam al qaeda linked terror module busted in assam)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसामच्या मोरीगाव, बारपेटा, गुवाहाटी आणि गोलपारा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या ११ जण हे ‘इस्लामिक कट्टरतावाद’शी संबंधित असून ते AQIS आणि ABT मधील आहेत. नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

- Advertisement -

जिहादी मॉड्यूलशी संबंधित सर्वांना अटक

राज्यातील ‘जिहादी मॉड्यूल’बाबत कठोर भूमिका घेत मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, या अटकेतून बरीच माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. “कालपासून आम्ही आसाममधील बारपेटा आणि मोरीगाव जिल्ह्यात दोन जिहादी मॉड्यूल पकडले आहेत आणि जिहादी मॉड्यूलशी संबंधित सर्व लोकांना अटक केली आहे,” असं बिस्वा सरमा म्हणाले. राष्ट्रीय पोलीस एजन्सींसोबत ही कारवाई करण्यात आली असून यातून आम्हाला बरीच माहिती मिळणे अपेक्षित आहे, असंही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -