घरताज्या घडामोडीयूजीसीच्या सुधारित गाईडलाईन जारी; ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम परीक्षा घेता येणार

यूजीसीच्या सुधारित गाईडलाईन जारी; ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम परीक्षा घेता येणार

Subscribe

आता विद्यापीठे आणि महाविद्यालये ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ शकतील. गृहमंत्रालयाच्या परवानगीनंतर यूजीसीने विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या परीक्षांसंदर्भात सुधारित गाईडलाईन जारी केल्या आहेत. यामध्ये जुलै महिन्यात परीक्षा घेण्याबाबतची सक्ती रद्द केली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा अनिवार्य असल्याचे सांगून त्या सप्टेंबरच्या अखेरीस घेण्यास परवानगी दिली. ही परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून घेतली जाऊ शकते. तसेच यूजीसीने विद्यापीठ आणि महाविद्यालयांना अशी सूट दिली आहे की, ‘स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ३० सप्टेंबरपर्यंत या परीक्षा कधी घेऊ शकता. पण यूजीसीला याबाबत माहिती द्यावी लागेल.’

- Advertisement -

यापूर्वी यूजीसीने २९ एप्रिला गाईडलाईन जारी करून सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना १ ते १५ जुलै दरम्यान अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास सांगितले होते. तर पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेसाठी १५ ते ३० जुलैपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली होती. पण या दरम्यान कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यांनी आणि विद्यापीठांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मानव संसाधन विकार मंत्रालयाने यूजीसीला नव्याने परीक्षासाठी दिलेल्या गाईडलाईनचा आढावा घेण्याचे निर्देश दिले होते.

त्यानंतर युजीसीने हरयाणा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. या अहवालानंतर यूजीसी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. यूजीसीने यासोबत विद्यापीठे आणि महाविद्यालयांना असे निर्देश दिले आहेत की, ‘यानंतरही एखादा विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देऊ शकत नसले तर त्याचे योग्य कारण मिळाल्यास त्याला परीक्षा देण्याची पुन्हा एकदा संधी द्या.’ सुधारित गाईडलाईनमध्ये यूजीसीचा जास्त भर अंतिम वर्षाच्या परीक्षेवर आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षासाठी यूजीसीने विद्यापीठांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे पदोन्नती करण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -