घरताज्या घडामोडीCorona: आता ऑन डिमांड करा कोरोना चाचणी

Corona: आता ऑन डिमांड करा कोरोना चाचणी

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना चाचणीशी संबंधित नवीन मार्गदर्शन सूचना (advisory) जारी केल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने आता लोकांसाठी ऑन डिमांड टेस्टिंग (On Demand Testing) जारी केली आहे. या अंतर्गत कोणत्याही प्रिस्क्रिप्शनविना ऑन डिमांड टेस्टिंग करता येऊ शकते. आरोग्य मंत्रालयाच्या मते, ‘असे व्यक्ती ज्यांना कोरोना चाचणी करायची आहे आणि ते प्रवास करीत आहेत तर ते ऑन डिमांड टेस्टिंग करू शकतात.’

- Advertisement -

याआधी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) शुक्रवारी advisory जारी केली. ज्यामध्ये जे व्यक्ती स्वतःची कोरोना चाचणी करण्यासाठी इच्छूक आहेत आणि असे व्यक्ती जे देशांतर्गत, राज्यांतर्गत प्रवेश करण्यासाठी कोरोना निगेटिव्ह चाचणीची मागणी करत आहे. त्यांना ऑन डिमांड टेस्टिंग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनावर राष्ट्रीय टास्क फोर्सने शिफारस केलेल्या चाचणी करण्याच्या धोरणासाठी सल्लागार म्हणाले की, ‘राज्य सरकार ऑन डिमांड टेस्टिंगसाठी सोपी कार्यपद्धती ठरवू शकतात.’

advisory मध्ये असे देखील सुचवले आहे की, ‘कंटेन्मेट झोनमध्ये राहणाऱ्या १०० टक्के लोकांची चाचणी अँटीजन टेस्टच्या माध्यमातून केली गेली पाहिजे. विशेषतः ज्या शहरांध्ये जेथे कोरोनाचा जास्त संसर्ग पसरलेला आहे. तसेच  advisory मध्ये पुढे सांगितले आहे की, कंटेन्मेट झोनमधील एंट्री पॉईंटवर नियमित देखरेख असावी.

- Advertisement -

दरम्यान देशात आज नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख पार झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ नवे रुग्ण आढळले असून १ हजार ८९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.


हेही वाचा – कल्याणमध्ये गणेशोत्सवात एकत्र आलेले ३२ जण कोरोनाबाधित!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -