Homeताज्या घडामोडीWomen Voters : देशातील निवडणुकांमध्ये महिला मतदानाचा टक्का वाढला; 'या' दोन योजना...

Women Voters : देशातील निवडणुकांमध्ये महिला मतदानाचा टक्का वाढला; ‘या’ दोन योजना ठरल्या सरस

Subscribe

2024 हे वर्ष निवडणुकांचं ठरलं असून लोकसभा, विधानसभा आणि राज्यसभा यांसारख्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये विरोधकांची इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए युती अशी लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीनंतर देशात पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन झालं. पण या निवडणुकांनंतर एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये महिला मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : 2024 हे वर्ष निवडणुकांचं ठरलं असून लोकसभा, विधानसभा आणि राज्यसभा यांसारख्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये विरोधकांची इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए युती अशी लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीनंतर देशात पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन झालं. पण या निवडणुकांनंतर एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये महिला मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याची माहिती देण्यात आली आहे. एसबीआयच्या संशोधन पथकाने हा अहवाल सादर केला असून, त्यामध्ये 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 1.8 कोटी अधिक महिलांनी मतदान केल्याची माहिती देण्यात आली आहे. (national women centric welfare schemes such as PMJAY and Mudra account scheme surge women to caste vote)

एसबीआयच्या संशोधन पथकाने सादर केलेल्या अहवालानुसार, यंदा महिला मतदानाचा टक्का वाढला आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 1.8 कोटी अधिक महिलांनी मतदान केले आहे. निवडणूक आयोगाने नुकतीच ही आकडेवारी जाहीर केली. या महिला नुकताच झालेल्या निवडणुकीत कोणाच्या विजयात तर कोणाच्या पराभवात सामील झाल्या आहे. पण देशभरातील महिलांचं निवडणुकीत मतदान वाढण्या मागचं कारणही या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यानुसार, महिला-केंद्रित योजनांमुळे महिलांच्या मतदानात वाढ झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या राज्यांमध्ये पंतप्रधान जन धन योजनेत आणि मुद्रा खाती उघडण्यात महिलांचा सहभाग जास्त आहे. त्या राज्यात महिला मतदारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ही वाढ इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या अहवालातील अधिक माहितीनुसार, महिला-केंद्रित योजना राबविणाऱ्या राज्यांची संख्या 19 आहे. ज्यामध्ये आसाम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक सारखी राज्ये समाविष्ट आहेत. या राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या सरासरी 7.8 लाखांनी (एकूण 1.5 कोटी) वाढली आहे. तसेच, गोवा, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये जिथे महिला-केंद्रित योजनांवर फारसे लक्ष केंद्रित केलेले नाही, तिथे महिला मतदारांची संख्या सरासरी फक्त 2.5 लाखांनी (एकूण 30 लाख) वाढली आहे.

दरम्यान, महिला साक्षरतेतील वाढ ही मतदारांच्या संख्येत वाढ होण्याशी थेट संबंधित आहे. महिला साक्षरतेत एक टक्का वाढ झाल्याने महिला मतदारांच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अहवालानुसार, साक्षरतेत वाढ झाल्यामुळे 45 लाख अधिक महिला मतदारांनी मतदान केले. रोजगार आणि मुद्रा योजनांमुळे आणखी 30 लाख महिलांनी मतदान केले. तसेच, पंतप्रधान आवास योजनेमुळेही महिलांना अधिक फायदा झाला असून तिथेही महिला मतदारांची संख्या अधिक वाढली आहे.


हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : कालपर्यंत ईव्हीएमला दोष देणारे…, मविआतील वादावर बावनकुळेंचे टीकास्त्र