घर देश-विदेश चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅंडिंगनंतर देशभरात जल्लोष; राष्ट्रपतींपासून राहुल गांधींनीही केले अभिनंदन

चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅंडिंगनंतर देशभरात जल्लोष; राष्ट्रपतींपासून राहुल गांधींनीही केले अभिनंदन

Subscribe

इस्रोच्या या कामगिरीवर कॉंग्रेस पक्षाने ट्वीट केले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल इस्रोसह सर्व देशवासियांचे अभिनंदन, असे ट्वीटमध्ये म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रृवार चांद्रयान-3 ची यशस्वी लॅंडिंग करत नवा इतिहास रचला आहे. या कामगिरीमुळे आपल्या देशाच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. इस्रोच्या या कामगिरीमुळे देशाचे राष्ट्रपतीपासून तर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.(Nationwide jubilation after Chandrayaan-3’s successful landing; Rahul Gandhi also congratulated the President)

इस्रोच्या या कामगिरीवर कॉंग्रेस पक्षाने ट्वीट केले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल इस्रोसह सर्व देशवासियांचे अभिनंदन, असे ट्वीटमध्ये म्हटले आहे. भविष्यात अवकाश संशोधनाची गरज पाहून पंडित नेहरूंनी इस्रोची पायाभरणी केली होती. त्यांच्या दूरदृष्टीचाच परिणाम आहे की आज भारत अवकाश संशोधन क्षेत्रात संपूर्ण जगात नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे असेही ट्वीटमध्ये म्हटले आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग ही एक महत्त्वाची घटना होती, जी आयुष्यात एकदाच घडते. असे म्हणत त्यांनी आनंद व्यक्त केला.

- Advertisement -

तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅंडिंदगनंतर इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतूक केले आहे. तर या कामगिरीमुळे भारताने आपल्या क्षमता आणि शक्तीचे प्रदर्शन केल्याचे दिसून येत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीच्या बळावरच हे होऊ शकले असेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी केले ट्वीटद्वारे अभिनंदन

राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, आजच्या कामगिरीमुळे टीम इस्रोला शुभेच्छा, तर चंद्राच्या दक्षिण ध्रृवार झालेली सॉफ्ट लॅंडिंग म्हणजे आपल्या वैज्ञानिकांच्या काही दशकांपासूनची मेहनत आणि त्यांच्या प्रतिभेचे रुप आहे. 1962 च्या नंतर भारत आंतराळ मोहिमेमध्ये झेपावत असून, ही कामगिरी देशातील युवकांना प्रेरित करणारी अशीच आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Chandrayan-3 : असा होता चांद्रयान-3 मोहिमेचा प्रवास; वाचा-कधी काय घडले?

राघव चढ्ढा म्हणाले आपण चंद्रावर आहोत

आपचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा हे म्हणाले की, चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅंडिंगनंतर आपण आनंदी आहोत असे म्हणत ट्वीटमध्ये म्हटले की, हे यश इस्रोच्या अदम्य भावनेची साक्ष देतो, त्यांची वचनबद्धता आणि कठोर परिश्रम प्रत्येक भारतीयांचे मन अभिमानाने फुलून जाते.

हेही वाचा : चंद्र आला कवेत; भारताच्या चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लॅंडिंग

देशासाठी ही एक विलक्षण कामगिरी आहे- नड्डा

चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, मी या मोहिमेशी संबंधित सर्व वैज्ञानिक आणि राज्यातील लोकांचे अभिनंदन करतो. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भारत अवकाश क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. हा आत्मनिर्भर भारत हा मंत्र खरा ठरत आहे. या यशस्वी लँडिंग मिशनमुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनला आहे. देशासाठी ही एक विलक्षण कामगिरी आहे असेही ते यावेळी म्हणाले. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या मोहिमेशी संबंधित असलेल्या सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -