घरट्रेंडिंगअॅमेझॉनवर हेच बघायंच बाकी होतं; ही वस्तूदेखील आली विक्रीला

अॅमेझॉनवर हेच बघायंच बाकी होतं; ही वस्तूदेखील आली विक्रीला

Subscribe

दसरा, दिवाळीच्या सणांना मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शॉपिंगच्या ऑफर्स येतात. विविध वस्तू ऑनलाईन विक्रीसाठी काढल्या जातात. यंदाही अॅमेझॉनवर (Amazon Great Indian Festival) मोठ्या प्रमाणात ऑफरची लाट आली होती. एरव्हीदेखील सर्वसामान्य ऑनलाईन शॉपिंगवर भर देतात. या ऑनलाईन शॉपिंगच्या वाढलेल्या क्रेजमुळे कोणत्याही वस्तू या विक्रीला काढल्या जात आहेत. नारळाच्या किसूळपासून बनवण्यात आलेली किसणी आता अॅमेझॉनवर विक्रीसाठी काढण्यात आली आहे. हे पाहून सर्वच जण अचंबित झाले आहेत. इतकेच नव्हे तर त्याच्या किंमतीतही सूट देण्यात आली आहे. किसणीचा एक प्रकार ४२५ ऐवजी १८४ रुपयांना तर दुसरा १९० पैकी ८३ रुपयांना विकण्यास ठेवला आहे.

ऑरगॅनिक आणि नैसर्गिक वस्तूंचा वापर जास्तीत जास्त करण्यात यावा या उद्देशाने ही वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. खरतंर पूर्वीपासून नारळाच्या किसूळने घरातील भांडी, तवा झाकला जात आहे. घरामध्ये उपलब्ध असलेल्या नारळाचा वापर करून किसूळ मिळवला जात आहे. आता थेट ऑनलॉईन विक्रीतही ही वस्तू पैसे देऊन विकत घेण्याची सवय ग्राहकांना लावली जात आहे. त्यामुळे यापुढे आणखी काय काय ग्राहकांना विक्रीसाठी पाहायला मिळेल, हे सांगता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -