घरदेश-विदेशनवीन पटनायक यांनी पाचव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

नवीन पटनायक यांनी पाचव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Subscribe

नवीन पटनायक यांनी ओडिशाच्‍या मुख्‍यमंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली.

नवीन पटनायक यांनी आज, बुधवारी सकाळी ओडिशाच्‍या मुख्‍यमंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. नवीन पटनायक यांनी पाचव्‍यांदा ओडिशाचे मुख्‍यमंत्री म्‍हणून पदभार स्‍वीकारणार आहेत. ते ५ मार्च २००० पासून ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. ओडिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांनी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्‍या शिफारशीनुसार मंगळवारी ११ आमदारांना कॅबिनेट मंत्री तसेच नऊ जणांना राज्य मंत्री म्‍हणून नियुक्त केले आहे.

- Advertisement -

हे आहेत मंत्रीमंडळातील नवे चेहरे 

पटनायक यांच्‍या मंत्रीमंडळात अनेक जुन्‍या आणि अनुभवी नेत्‍यांसोबत काही नव्‍या मंत्र्यांनादेखील स्‍थान मिळणार आहे. मंत्रीमंडळात परमानंद नायक, टुकुनी साहू, समीर दास, नवकिशोर दास, पद्मिनी दियान, रघुनंनदन दास, दिव्यशंकर मिश्र, जगन्नाथ सडाका, ज्योतिप्रकाश पाणिग्रही आणि तुसारकांती बेहरा हे दहा नवे चेहरे असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -