घरदेश-विदेशनवी मुंबई शहर पुन्हा एकदा स्वच्छता यादीत, 2022 च्या स्वच्छता सर्व्हेक्षणांतर्गत महाराष्ट्रातून...

नवी मुंबई शहर पुन्हा एकदा स्वच्छता यादीत, 2022 च्या स्वच्छता सर्व्हेक्षणांतर्गत महाराष्ट्रातून तिसऱ्या स्थानी

Subscribe

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छता क्रमांकांची घोषणा करण्यात आली. या मध्ये संपूर्ण भारतातून सर्वाधिक मोठ्या शहरांमधून मध्य प्रदेश मधील इंदूरची पहिल्या क्रमांकावर निवड करण्यात आली आहे. तसेच लहान शहरांमध्ये त्रिपुरा शहर पहिल्या क्रमांकावर आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व विजेत्या शहरांचे अभिनंदन करत इंदूर मॉडल संपर्ण देशामध्ये लागू करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. 2022 पुरस्कारामध्ये मध्य प्रदेशमधील इंदूर शहराला लागोपाठ सहा वेळा भारतातील स्वच्छ शहर म्हणून स्थान प्राप्त झाले आहे.

केंद्राच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इंदूरला लागोपाठ सहा वेळा भारतातील सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून निवडण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर सुरत आणि तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई शहराची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

सर्वेक्षणानुसार, 100 पेक्षा कमी शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या राज्यात त्रिपुरा शहराने पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच एका लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील पाचगणीचा क्रमांक पहिल्या स्थानी आला आहे. त्यानंतर छत्तीसगढमधील पाटन दुसऱ्या क्रमांकावर आणि महाराष्ट्रातील कराड शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

तसेच एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये हरिद्वार प्रथम क्रमांकावर आहे तर त्यानंतर वाराणसी आणि ऋषिकेशचा क्रमांक आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘या’ 13 शहरांत उपलब्ध होणार 5G; पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या करणार उद्घाटन

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -