Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची पक्षनेतृत्वाने पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पंजाब काँग्रेसमध्ये अतंर्गत सुरु असलेल्या वाद सुरु आहेत. या दरम्यान, पक्षनेतृत्वाने हा निर्यण घेतला आहे. सुनील जाखड यांच्या जागी नवज्योतसिंग सिद्धू यांची निवड झाली आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये गेले काही महिने वाद सुरु होते. दरम्यान, रविवारी पक्षनेतृत्वाने नवज्योतसिंग सिद्धू यांची प्रदेशाध्यपदी नियुक्ती केली. याशिवाय, चार कार्यकारी अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. संगत सिंह, कुलजीत नागरा, पवन गोयल आणि सुखविंदर डैनी यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पंजाब विधानसभा काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्याआधी नवज्योतसिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं आहे.

- Advertisement -

नवज्योतसिंग सिद्धू यांनी सन २०१७ मध्ये भाजपला सोडत आणि निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री पदासाठी लढत होते, मात्र अमरिंदर सिंग यांनी त्यांना कमी महत्वाची खाती देत साईडलाईन केलं. २०१९ मध्येच सिद्धू मंत्रिमंडळातूनही बाहेर पडले आणि आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक झाले होते.

- Advertisement -

अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात बराच काळ वाद सुरू होता. शनिवारी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्यास सहमती दर्शविली होती, मात्र त्यांनी त्यासाठी काही अटी घातल्या आहेत.

 

- Advertisement -