घरदेश-विदेशनवजोत सिंग सिद्धूंना मोठा झटका, 34 वर्ष जुन्या प्रकरणात एक वर्षाची सश्रम...

नवजोत सिंग सिद्धूंना मोठा झटका, 34 वर्ष जुन्या प्रकरणात एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा

Subscribe

काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धूंना सर्वोच्च न्यायालयाने जुन्या प्रकरणात एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर कार पार्किंगवरून झालेल्या वादा प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सुनावणी सुरू होती. हे प्रकरण 34 वर्ष जुने आहे. नवज्योत आणि त्याच्या मित्राची पटियाळा येथील कार पार्किंगवरून वाद झाला होता. या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून सिद्धूंना शिक्षा झाली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने हत्या करण्याचा हेतू नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले होते. या प्रकरणात दोन वर्षांनंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

हेही वाचा – मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींचा अटकपूर्व जामीन मंजूर

- Advertisement -

या प्रकरणात सत्र न्यायालयाने सिद्धूला 1999 साली निर्दोष सोडले होते. त्यांतर उच्च न्यायालयाने 2006 साली सिद्धूला 3 वर्षाची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड केला होता. या विरोधात सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचा निकाल 16 मे 2018 रोजी लागला. यात हत्येचा हेतू नसल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला आरोपातून मुक्त केले होते. मात्र, त्याला आयपीसी कलम 323 नुसार दोषी ठरवण्यात आले होते. यामुळे त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली नाही फक्त 1 हजार रुपयांचा दंड करण्यात होता.

हेही वाचा – मुंबई इंडियन्सच्या ‘या’ फलंदाजाचे सुनील गावस्करांनी केले कौतुक; म्हणाले, ‘भारतासाठी सर्व फॉर्मेटमध्ये…’

- Advertisement -

काय आहे प्रकरण –

रोडरेज प्रकरण 1988 सालचे आहे. सिद्धचे पटियाळा येथे कार पर्किंगवरून 65 वर्षांच्या गुरनाम सिंह यांच्याशी भांडन झाले होते. या वादात सिद्धने त्या व्यक्तीला मारहाण केली. त्यांनर गुरनाम यांचे निधन झाले, असा आरोप सिद्धूवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदर सिंह सिद्धू यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -