घरताज्या घडामोडीनवज्योत सिंग सिद्धूंकडून प्रशांत किशोर यांचा फोटो ट्विट; म्हणाले, जुना मित्र सगळ्यात...

नवज्योत सिंग सिद्धूंकडून प्रशांत किशोर यांचा फोटो ट्विट; म्हणाले, जुना मित्र सगळ्यात…

Subscribe

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची ऑफर नाकारली आहे. देशामध्ये काँग्रेसला पुनर्जिवीत करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी प्रेझेंटेशन दिले, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक केली परंतु निर्णय घेण्याच्या वेळी प्रशांत किशोर यांनी माघार घेतली आहे. प्रशांत किशोर यांनी ऑफर नाकारल्याची चर्चा सुरु असताना पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत फोटो ट्विट करुन जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. जुने मद्य आणि जुना मित्र चांगला असतो असं सिद्धूंनी फोटो ट्विट करत म्हटलं आहे.

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी मंगळवारी रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. भेटीनंतर नवज्योत सिंह सिद्धू यांनी एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोतील कॅप्शनमध्ये सिद्धू म्हणाले की, जुना मित्र प्रशांत किशोर यांची भेट सुखद होती. जुने मद्य, जुने सोने आणि जुने मित्र सगळ्यात चांगले असतात. असे ट्विट नवज्योत सिद्धू यांनी केले आहे. परंतु प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये सहभागी होण्यास नकार दिला त्याच्या थोडा वेळानंतर सिद्धूंनी ट्विट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चा सुरु झाल्या आहेत.

- Advertisement -

सोनियांसोबत प्रशांत किशोर यांच्या मॅरेथॉन बैठका

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी लागोपाठ अनेक बैठका घेतल्या आहेत. मागील काही वर्षांपासून पक्षाला आलेले अपयश पाहता काँग्रेसला पुनर्जिवीत करण्यासाठी प्रेझेंटेशन देण्यात आले. काँग्रेसला पुन्हा मार्गस्थ करण्यासाठीचा सल्लासुद्धा प्रशांत किशोर यांनी दिला होता.

- Advertisement -

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करुन प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये येण्यास नकार दिला असल्याची माहिती दिली आहे. तसेच प्रशांत किशोर यांच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केलं आहे. यानंतर प्रशांत किशोर यांनी ट्विट करत काँग्रेसची ऑफर नाकारली असल्याची माहिती दिली आहे.


हेही वाचा : प्रशांत किशोरने धुडकावली काँग्रेस पक्षात सहभागी होण्याची ऑफर, ट्वीट करत दिली माहिती

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -