घर क्रीडा Navjot Singh Sidhu : 'जखमा बऱ्या झाल्या पण...'; कॅन्सरशी लढा देत असलेल्या...

Navjot Singh Sidhu : ‘जखमा बऱ्या झाल्या पण…’; कॅन्सरशी लढा देत असलेल्या पत्नीसाठी सिद्धूंनी लिहिली भावनिक पोस्ट

Subscribe

Navjot Singh Sidhu : भारताचे माजी क्रिकेटपटू, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योतसिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) अलिकडेच रोज रेज प्रकरणातून तुरुंगातून बाहेर आले आहेत. परंतु ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रासाचा सामना करत आहेत. त्यांची पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू (Dr. Navjot Kaur sidhu) या कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढा देत आहेत. अशा परिस्थितीत सिद्धू आपल्या पत्नीची अधिक काळजी घेताना दिसतात. ते त्यांच्यासोबत वेगवेगल्या मंदिरात जाताना दिसतात. यासंदर्भात सिद्धू दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांनी नुकतेच एक ट्वीट केले आहे, जे व्हायरल होत आहे. (Navjot Singh Sidhu Wounds healed but Sidhu wrote an emotional post for his wife who is battling cancer)

सिद्धू यांनी ट्वीट करताना म्हटले की, “जखमा बऱ्या झाल्या पण, या परीक्षेच्या मानसिक जखमा कायम राहतील. पाचवी केमो चालू आहे. चांगली नस शोधण्यात काही काळ व्यर्थ गेला. त्यानंतर रुपिंदरचे कौशल्य कामी आले. त्यांनी पत्नीला हात हलवण्यास नकार दिला म्हणून मी चमच्याने तिला खाऊ घातले. शेवटच्या केमोनंतर मोठ्या प्रमाणात रक्तवहिन्यासंबंधी प्रतिक्रिया लक्षात आली. माझ्या पत्नीला उष्णता आणि अति आर्द्रतेमुळे अतिशयोक्ती होत आहे. त्यामुळे तिला सांत्वनासाठी मनालीला घेऊन जाण्याची वेळ आली आहे, असे सिद्धूंनी आपल्या ट्विटरमध्ये म्हटले.

नवज्योत कौर यांनीही लिहिलि होती भावनिक पोस्ट

- Advertisement -

दरम्यान, सिद्धू तुरुंगात असताना कॅन्सरच्या शस्त्रक्रियेपूर्वी सिद्धूच्या पत्नी नवज्योत कौर यांनीही एक भावनिक पोस्ट लिहिली होती. सिद्धूला धडा शिकवण्यासाठी आपण देवाकडे मृत्यू मागितल्याचे त्यांनी लिहिले होते. पतीच्या पंजाबवरील प्रेमाने त्यांनी मला कोणत्याही आसक्तीच्या पलीकडे ठेवले होते. मी रोज तुझी वाट पाहते. तुला न्याय नाकारला गेला, पण सत्य इतके शक्तिशाली आहे की, ते तुझी परीक्षा घेत आहे. मला माफ करा, तुमची वाट पाहू शकत नाही. कर्करोगाचा हा दुसरा प्राणघातक टप्पा आहे, असे त्यांनी लिहिले होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -