घरदेश-विदेशपाकमधल्या निवडणुकीत सिद्धु जिंकतील - इम्नान खान

पाकमधल्या निवडणुकीत सिद्धु जिंकतील – इम्नान खान

Subscribe

नवज्योत सिंग सिद्धू यांना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून निवडणूक लढवावी ते नक्की जिंकतील असं वक्तव्य पाकिस्तानचे पंचप्रधान इम्नान खान यांनी केलं आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून निवडणूक लढवावी ते नक्की जिंकतील असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांनी केलं आहे. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्हयातील डेरा बाबा नानक आणि पाकिस्तानमधील नरोवाल येथील गुरुद्वारा कर्तारपूर साहिब या दोन ठिकाणांना जोडणारा मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमासाठी नवज्योत सिंग सिद्धू पाहुणे म्हणून पाकिस्तानला गेले आहेत. त्यावेळी बोलताना इम्नान खान यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्याबद्दल हे विधान केलं आहे. यावेळी बोलताना, नवज्योत सिंग सिद्धू माझ्या शपथविधीच्या कार्यक्रमाला देखील आले होते. पण जेव्हा सिद्धू मायदेशी परतले तेव्हा त्यांच्यावर टीका झाली. त्यांच्यावर ऐवढी टीका का झाली ? हे मला कळलंच नाही असं देखील यावेळी इम्नान खान यांनी म्हटलं आहे. त्यावेळी सिद्धू फक्त शांतता आणि बंधुत्वाबद्दल बोलत होते. त्यामुळे सिद्धू यांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून निवडणुका लढवल्यास ते नक्की जिंकतील असं इम्नान खान यांनी म्हटलं आहे.

Pak PM Imran Khan: I heard there was a lot of criticism of Sidhu when he went back after my oath-taking ceremony. I don’t know why was he criticised. He was just talking about peace & brotherhood. He can come and contest election here in Pakistan’s Punjab, he’ll win. #Kartarpur pic.twitter.com/KkCoUn366x

- Advertisement -

— ANI (@ANI) 28 November 2018


यावेळी त्यांनी भारत – पाक मैत्री सुधारली पाहिजे याचा देखील पुर्नरूच्चार केला. पाकिस्तानातील राजकीय पक्ष, लष्कर देखील त्याच मताचे असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. भारत – पाक संबंध सुधारण्यामध्ये पाकिस्तानी लष्कराची आडकाठी असल्याच्या चर्चा नेहमीच रंगतात. शिवाय, ही बाब वेळोवेळी स्पष्ट देखील झालेली आहे. त्या पार्श्वभूमिवर इम्नान खान यांनी हे विधान केलं आहे. यावेळी इम्नान खान यांनी दोन्ही देशांनी पुढे येऊन यावर चर्चा करावी आणि प्रश्नांवर तोडगा काढावा असं देखील म्हटलं आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी  विराजमान झाल्यानंतर देखील इम्नान खान यांनी भारत – पाक संबंध सुधारण्यावर भर देऊ असं म्हटलं होतं. पण, सध्या पाकिस्तानकडून दहशतवादाला मात्र प्रोत्साहन दिलं जात आहे.

- Advertisement -

वाचा – भारतासोबत आम्हाला चांगले संबंध अपेक्षित – इम्नान खान

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -