जेलमध्येही सिद्धू पा ची ठोको ताली, वैतागलेल्या कैद्यांचे बॅरकच बदलेले

पंजाबचे काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि वाद असे समीकरणच असून पटियाला जेलमध्येही त्यांचा इतर कैद्यांबरोबर वाद झाला आहे.

पंजाबचे काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि वाद असे समीकरणच असून पटियाला जेलमध्येही त्यांचा इतर कैद्यांबरोबर वाद झाला आहे. सिद्धू यांची वर्तणूक बरोबर नसल्याचा आरोप कैद्यांनी केला आहे. यामुळे या कैद्यांना दुसऱ्या बॅरकमध्ये हलवण्यात आले आहे.

नवज्योत सिंग सि्दधू यांना रोडरेज प्रकरणी एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ते सध्या पटियाला मध्यवर्ती जेलमध्ये आहेत. पण तेथेही त्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याने सि्दधू यांच्यासोबत बॅरकमध्ये असलेले कैदीही वैतागले आहेत. यातील तीन कैद्यांनी आमचे बॅरक बदला अशी मागणी जेल प्रशासनाला केली. त्यानंतर त्यांना इतर बॅरकमध्ये हलवण्यात आले. याबद्दल सि्दधू यांनी मात्र कैदीच आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. कैद्यांनी आपल्या कँटीन कार्डवरून वाटेल तसे सामान खरेदी केल्याचा आरोप सिद्धू यांनी केला आहे. दरम्यान, तुरुंग अधिकाऱ्यांनी सिद्धू यांच्यासोबत राहणाऱ्या कैद्यांना दुसऱ्या बॅरकमध्ये हलवले आहे.

सिद्धू यांना  पाच कैदयांबरोबर दहा क्रमांकाच्या बॅरकमध्ये ठेवण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सि्दधू यांना बॅरक सोडून बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सि्दधू यांना कॅंटीनमधून सामान आणण्यासाठी इतर कैद्यांवर अवलंबून राहावे लागते. सि्दधू सामान आणण्यासाठी कँटीन कार्ड इतर कैद्यांना देतात आणि वस्तू मागवतात. पण काही कैद्यांनी या कार्डवरून अनावश्यक सामान मागवले यावरून सिद्दू बरोबर त्यांचा वाद झाला.