‘नवनीत यांना दिल्लीत पाठवल्याशिवाय विकास नाही’

आज युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या नवनीत कौर राणा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचा आर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. 'नवनीत यांना दिल्लीत पाठवल्याशिवाय विकास होणार नाही', असे धनंजय मुंडे म्हणाले.

Navneet rana
नवनीत राणा

नवनीत यांना दिल्लीत पाठवल्याशिवाय विकास होणार नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. आज युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या नवनीत कौर राणा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचा आर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर सडकून टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीकडून नवनीत कौर राणा यांना पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. १७ मार्च रोजी नवनीत यांनी आघाडीत सहभाग घेतला. त्यामुळे आघाडीने त्यांच्यासाठी एक जागा सोडली आहे.

नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?

धनंजय मुंडे यांनी आनंदराव अडसूळ यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रात एकमेव निष्क्रिय खासदार आहे, ते म्हणजे आनंदराव अडसूळ.’ मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. ‘या सरकारने १२५ कोटी जनतेला फक्त स्वप्न दाखवलं. मी नरेंद्र मोदींचे एकही भाषण विसरले नाही. अच्छे दिनाच्या नावाने १२५ कोटी जनतेला फसवलं आहे’, असे मुंडे म्हणाले. यापुढे मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही टीका केली. ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंएवढा दुबळा नेता मी कधी पाहिला नाही, कमला बाईचे पाय चाटत पुन्हा एकत्र आले.’

‘…तर मी उमेदवारी सोडेल’

यावेळी नवनीत कौर राणा म्हणाल्या की, ‘गेल्या नऊ वर्षांपासून मी जीवाचं रान करुन अमरावती जिल्ह्यात सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या १० वर्षात या खासदारांनी काय विकास केला? या खासदारांनी केवळ पाच कामे सांगावी, मी माझी उमेदवारी मागे घेईल.’