घरदेश-विदेशमहाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत 'पेनड्राईव्ह बॉम्ब'चे स्फोट; फडणवीसांनंतर नवनीत राणांनी दिल्लीत सादर केले...

महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’चे स्फोट; फडणवीसांनंतर नवनीत राणांनी दिल्लीत सादर केले पुरावे

Subscribe

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेनड्राईव्ह बॉम्ब सादर करत राजकारणात स्फोट घडवून आणले. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांविरोधातील स्टिंग ऑपरेशनचे पुरावे सादर करत त्यांनी सरकारला जोरदार धक्का दिला. फडणवीसांनी दोन पेनड्राईव्ह बॉम्ब टाकत ठाकरे सरकारला टार्गेट केले. पेनड्राईव्ह बॉम्ब सादर करत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री भाजप नेत्यांविरोधात कट कारस्थान रचत असल्याचे आरोप केले. तर काल आमदार नितेश राणे यांनी देखील आणखी एक पेनड्राईव्ह बॉम्ब टाकत सरकारवर गंभीर आरोप केले. कोल्हापुरच्या रुग्णालयात असताना आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप नितेश राणे यांनी केले. आता महाराष्ट्रानंतर दिल्लीत सुद्धा या पेनड्राईव्ह बॉम्बचे स्फोट सुरु झालेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज संसदेत पेनड्राईव्ह बॉम्ब सादर करत आरोप केले आहे. या आरोपांमुळे संसदेतील वातावरण अधिकच तापलेय.

खासदार नवनीत राणा यांनी पेनड्राईव्ह सादर करत एका प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. आरती सिंह या महिला अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी जोरदार मागणी नवनीत राणा यांनी केली. तसेच या पेनड्राईव्हची आणि आरोपांची दखल लोकसभा अध्यक्षांनी देखील घेतल्याचा दावा राणा यांनी केली.

- Advertisement -

या पेनड्राईव्ह आणि फोटोच्या माध्यमातून माझ्यावर झालेल्या अन्यायाचे मी पुरावे दिले, अशी माहिती यावेळी नवनीत राणा यांनी दिली. पण नवनीत राणा यांच्या पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय आहे? यावरून अनेक सवाल उपस्थित होत आहे. मात्र महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत या पेनड्राईव्ह बॉम्बने राजकारणात खळबळ निर्माण केल्याचे म्हटले जातेय.

महाविकास आघाडी सरकार पोलीस प्रशासनाचा गैरवापर करत असल्याचे आरोप सातत्याने नवनीत राणा आणि रवी राणा करत आहेत. अलीकडेच महापालिकेच्या आयुक्तांवर शाही फेकचा प्रकार घडला होता. तेव्हापासून रवी राणा चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणावरून राज्य सरकारविरोधात नवनीत राणा पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसतेय. आता पुन्हा नव्या अधिकाऱ्यावर नवनीत राणा यांनी आरोप करत पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला आहे.


राज्यातील १६ शहरांतील वीज कंपन्यांचे खासगीकरण होणार नाही; केंद्राच्या वीज संशोधन बिलासही विरोध


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -