घरदेश-विदेशमी त्यांच्याशी समजूतदारपणे वागले संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीवर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

मी त्यांच्याशी समजूतदारपणे वागले संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीवर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

Subscribe

लडाखमध्ये संसदीय समितीच्या अभ्यास दौर्‍यावर गेलेले शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे एकत्रित फिरताना, स्नेहभोजन करतानाचे फोटो समाजमाध्यमांत चांगलेच व्हायरल होत आहेत. यावरून बर्‍याच उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी त्यावर भाष्य केले. हा एक अभ्यास दौरा होता. केवळ संजय राऊतही या दौर्‍यावर येणार होते म्हणून मी तेथे गेले नसते, तर मी माझ्या कामावर अन्याय केल्यासारखे झाले असते. त्यामुळे अत्यंत समजूतदारपणे मी त्यांच्याशी वागले, असे नवनीत राणा म्हणाल्या.

महाराष्ट्रात हनुमान चालीसावरून रंगलेल्या वादादरम्यान राणा दाम्पत्य आणि संजय राऊत यांनी एकमेकांवर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती. संजय राऊत राणा दाम्पत्याला बंटी-बबली म्हणून संबोधत होते, तर नवनीत राणा यांनी थेट दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहून संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती, परंतु लडाखच्या दौर्‍यावर हे तिघेही एकमेकांसोबत गप्पा मारताना, फिरताना दिसून आल्यावर सर्वांच्या भुवया उंचावल्या.

- Advertisement -

यासंदर्भात लडाखवरून दिल्लीत दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता नवनीत राणा म्हणाल्या की, संजय राऊत लडाखमध्ये येणार म्हणून मी तेथे गेले नसते, तर माझ्या कामाशी मी अन्याय केला असे झाले असते आणि मला तसे करायचे नव्हते. त्यामुळेच मी लडाखमध्ये गेले. संजय राऊतांवर नव्हे, तर माझ्यावर अत्याचार झाले आहेत. मला तुरुंगामध्ये टाकले गेले. १४ दिवस आम्ही तुरुंगात राहिलो. महाराष्ट्राची संस्कृती आणि प्रगल्भता आम्ही जपली, त्यांनी नाही. ही माझी विचारांची लढाई आहे. माझे विचार महाराष्ट्राच्या विकासासाठी आहेत. त्यामुळे विचारांची लढाई सुरूच राहील, असेही राणा म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -