नौदल आणि NCBची अरबी समुद्रात मोठी कारवाई, ‘इतके’ हजार कोटींचे ड्रग्ज पकडले

भारतीय नौदल आणि एनसीबीकडून अरबी समुद्रात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. देशातील सर्वात मोठी छापेमारी करत अरबी समुद्रात तब्बल 12 हजार कोटी रुपयांचे ड्रग्स पकडण्यात आले आहेत.

Navy and NCB's major operation in Arabian Sea, seized drugs worth thousand crores

भारतीय नौदल आणि एनसीबीकडून अरबी समुद्रात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. देशातील सर्वात मोठी छापेमारी करत अरबी समुद्रात तब्बल 12 हजार कोटी रुपयांचे ड्रग्स पकडण्यात आले आहेत. (Navy and NCB’s big operation in Arabian sea, drugs worth 12 thousand crores seized) या प्रकरणी ड्रग माफियाला देखील अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर या नंतर देशात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. तसेच हा ड्रग्स साठा इराणमधून आणला गेला असून तो गुजरातच्या बंदरावर उतरवला जाणार होता, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – कर्नाटक विधानसभेत काँग्रेस विजयानंतर संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाचा घेतला समाचार

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाला ड्रग्सचा साठा येणार असल्याची माहिती मिळाली होती. काही ड्रग्स माफिया भारतात ड्रग्स आणणार आहेत. अरबी समुद्रातून ही तस्करी केली जाणार आहे. कुठल्या तरी बंदरावर हे ड्रग्स उतरवले जाणार आहेत, अशी माहिती नौदलाला देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे नौदल आणि एनसीबीने संयुक्त कारवाई करत हा साठा पकडला. तर नौदलाच्या INS TEG F-45 या जहाजाने अरेबियन सी एरियामएध्ये हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्सचा साठा पकडला आहे. अधिकाऱ्यांनी ड्रग्स माफियांनाही यावेळी अटक केली आहे. महहत्त्वाची गोष्ट म्हणजे सूडानमधील भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी हे जहाज तैनात करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी या जहाजातून सुडानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित आणले. त्यानंतर या जहाजाने ही मोहीम देखील यशस्वीरित्या फत्ते केली आहे.

नौदल आणि एनसीबीने या कारवाईत 2600 किलो ड्रग्स पकडले आहे. या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 12 हजार कोटी रुपये किंमत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या कारवाईत अटक करण्यात आलेल्या ड्रग्स माफियाला कोची बंदरावर नेण्यात आलेले आहे. दरम्यान या प्रकरणी नौदल आणि एनसीबीने पुढील चौकशी सुरू केली असून या ड्रग्सच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे? अटक करण्यात आलेल्या ड्रग्स माफियाने यापूर्वी भारतात किती आणि कुठे ड्रग्सचा साठा आणला होता? अजूनही असा अंमली पदार्थाचा साठा येणार आहे काय? याचा तपास करण्यात येत आहे.