मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर नौदलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅण्डिंग, तिघांना सुखरूप वाचवले

मुंबई : भारतीय नौदलाचे ध्रुव हेलिकॉप्टरला बुधवारी समुद्र किनाऱ्यावर अपघात झाला. नौदलाचे अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर (एएलएच) मुंबईहून नियमित उड्डाणासाठी जात असताना या हेलिकॉप्टर इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. हेलिकॉप्टरमधील तीन क्रू मेंबर्सना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सोबतच या घटनेची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, असेही भारतीय नौदलाकडून सांगण्यात आले.

भारतीय नौदलाच्या अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरने (एएलएच) बुधवारी मुंबईहून नियमित उड्डाण घेतल्यानंतर किनारपट्टीवर ते आपत्कालीन लँडिंग करत होते. त्यावेळी ते कोसळले. नौदलाच्या गस्ती विमानाने या हेलिकॉप्टरमधील तीन क्रू मेंबर्सची सुटका केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

(सविस्तर वृत्त लवकरच)