घरदेश-विदेशनवाज शरीफ यांना १० वर्षांचा कारावास

नवाज शरीफ यांना १० वर्षांचा कारावास

Subscribe

नवाज शरीफ यांना भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी पाकिस्तानच्या न्यायालयाने त्यांना १० वर्षे तर त्यांच्या मुलीला ७ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना न्यायालयाने १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानच्या न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी नवाज यांच्या मुलीलाही ७ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. नवाज आणि त्यांच्या कुटूंबाविरोधात पाकिस्तानामध्ये भ्रष्टाचाराशी संबंधित खटला चालू होता. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या वरिष्ठ न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला आदेश दिले की, नवाज आणि त्यांच्या कुटुंबासंबंधित खटल्यांचा निकाल निवडणूकी अगोदर देण्यात यावा.

न्यायालयाने फेटाळली याचिका

लंडनच्या एका अलिशान प्रॉपर्टी प्रकरणी न्यायालयाने नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलीला दोषी ठरवले आहे. नवाज शरिफ यांची मुलगी मरियमने न्यायालयात याचिका दाखल केली होती की, न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल एक आठवड्यानंतर द्यावा. तिने याचिकेमध्ये सांगितले होते की, तिच्या आईची प्रकृती बिघडली आहे. मरियमने याचिकेसोबत मेडिकल रिपोर्ट देखील संलग्न केले होते. परंतु, न्यायालयाने तिची याचिका फेटाळून लावली.

- Advertisement -

सध्या लंडनमध्ये आहेत नवाज

नवाज आणि मरियम सध्या लंडनमध्ये आहेत. तिथे नवाज यांच्या पत्नी कुलसुम नवाज यांच्यावर आजारावर उपचार केला जात आहे. कुलसुम यांना गळ्याचा कॅन्सर झाला आहे. मागील वर्षी कुलमुस यांच्या गळ्यात कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ब्रिटनला पाठवण्यात आले होते. बुधवारी पाकिस्तानच्या न्यायालयाने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. पाकिस्तानच्या न्यायालयाने काही दिवसांनी या प्रकरणावर सुनावणी करावी, अशी विनंती न्यायालयाला केली असल्याचे नवाज यांनी बुधवारी माध्यमांना सांगितले.

भ्रष्टाचारामुळे नवाज यांना पंतप्रधानपद सोडावे लागले

भ्रष्टाचार करुन लंडनला अलिशान चार घरे घेतल्याचा आरोप नवाज यांच्यावर होता. या आरोपामुळे नवाज यांना २०१७ मध्ये आपले मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. त्यानंतर नवाज यांच्यावर पाकिस्तानच्या विरोध पक्षनेत्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. आज न्यायालयाने याप्रकरणी नवाज यांना दोषी ठरवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -