घर देश-विदेश नवाज शरीफ थेटच बोलले; म्हणाले- आपण भीक मागतोय आणि भारत...

नवाज शरीफ थेटच बोलले; म्हणाले- आपण भीक मागतोय आणि भारत…

Subscribe

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ म्हणाले की, भारत चंद्रावर पोहोचला आणि G-20 परिषदेचे यजमानपद भूषवत जगाचे लक्ष केंद्रीत करत आहे. तर याउलट पाकिस्तान जगाकडे पैशाची भीक मागत आहे. हे धोकादायक असल्याचेही ते म्हणाले.

नवी दिल्ली : आर्थिक तंगीत असलेल्या पाकिस्तानची अवस्था सध्या बिकट आहे. आर्थिक स्थितीसोबतच पाकिस्तानमध्ये राजकीय परिस्थितीसुद्धा ठीक नाही. याच परिस्थितीवर बोट ठेवत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ संतापले असून, त्यांनी माजी लष्कर प्रमुख आणि मुख्य सरन्यायधीशांना खडेबोल सुनावले.(Nawaz Sharif spoke directly They said  we are begging and India)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ म्हणाले की, भारत चंद्रावर पोहोचला आणि G-20 परिषदेचे यजमानपद भूषवत जगाचे लक्ष केंद्रीत करत आहे. तर याउलट पाकिस्तान जगाकडे पैशाची भीक मागत आहे. हे धोकादायक असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

पाकिस्तान देशाची अर्थव्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीत आहे. अनियंत्रित दुहेरी आकडी चलनवाढीच्या रूपाने गरीब जनतेवर अनाठायी दबाव आणला आहे. शरीफ यांनी सोमवारी संध्याकाळी व्हिडिओ लिंकद्वारे लंडनहून लाहोरमध्ये पक्षाच्या सभेला संबोधित करताना विचारले की, आज पाकिस्तानचे पंतप्रधान एका देशात जाऊन पैसे मागतात, तर भारत चंद्रावर पोहोचला आहे. भारताने जे साध्य केले ते पाकिस्तान का साध्य करू शकले नाही? याला इथे जबाबदार कोण? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा : शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार आले धावून; अल्पदरात मिळणार 3 लाखापर्यंतचे कर्ज

अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळाचा केला उल्लेख

- Advertisement -

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे वरिष्ठ नेते नवाज शरीफ पुढे म्हणाले की, भारताने 1990 मध्ये त्यांच्या सरकारने सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांचे पालन केले आहे. ते म्हणाले, ‘अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा भारताकडे फक्त एक अब्ज डॉलर्स होते पण आता भारताचा परकीय चलनाचा साठा 600 अब्ज डॉलर्स झाला आहे. भारत आज कुठे पोहोचला आहे आणि काही रुपयांसाठी जगाला भीक मागण्यात पाकिस्तान कुठे मागे राहिला आहे, असा सवाल त्यांनी केला.

हेही  वाचा : महाराष्ट्राच्या सूनबाई IAS टीना डाबी यांच्या घरी गुडन्यूज; देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

पुढील महिन्यांत पाकिस्तानात दाखल होणार शरीफ

आगामी निवडणुकीत पक्षाच्या राजकीय प्रचाराचे नेतृत्व करण्यासाठी शरीफ यांनी 21 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच देशात परतण्याचे शरीफ यांनी यावेळी जाहीर केले. नोव्हेंबर 2019 मध्ये, अल अझिझिया मिल्स भ्रष्टाचार प्रकरणात सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या शरीफ यांना तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी वैद्यकीय कारणास्तव देश सोडण्यास मदत केली होती. पुढील महिन्यात लाहोरला पोहोचण्यापूर्वी त्यांना सावधगिरीचा जामीन मिळेल असे पीएमएल-एनचे म्हणणे आहे. त्यांच्या परतल्यावर त्यांच्या पक्षाने ऐतिहासिक स्वागताचे नियोजन केले आहे.

- Advertisment -