घरदेश-विदेशपाकिस्तानच्या दुर्दशेला इम्रान खानसह पाच जण जबाबदार, नवाझ शरीफ यांच्या मुलीचा आरोप

पाकिस्तानच्या दुर्दशेला इम्रान खानसह पाच जण जबाबदार, नवाझ शरीफ यांच्या मुलीचा आरोप

Subscribe

इस्लामबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी आणि पाकिस्तान मुस्लीम लीगच्या (नवाज) उपाध्यक्ष मरियम नवाझ यांनी, पाकिस्तानच्या दुर्दशेसाठी पाच जणांना जबाबदार धरले आहे. तसेच पेशावर येथे झालेल्या बॉम्बस्फोटामागे आयएसआयचा माजी प्रमुख जनरल फैझ हामिद असल्याचा आरोपही त्यांनी केला.

लंडनहून चार महिन्यांनंतर पाकिस्तानात परतल्यानंतर बहावलपूरमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना मरियम नवाज म्हणाल्या की, ‘देशातील पाच लोकांनी देश उद्ध्वस्त केला आहे. कठीण निर्णय घ्यावे लागतील, अशा टप्प्यावर देश कसा पोहोचला हे समजून घेणे आवश्यक आहे.’ त्यांनी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) अध्यक्ष इम्रान खान, पाकिस्तानचे माजी मुख्य न्यायाधीश साकिब निसार आणि आसिफ सईद खोसा यांची नावे घेतली. मात्र इतर दोघांची नावे त्यांनी उघड केली नसली तरी, ते दोघे इम्रान खान यांचे शिष्य असल्याचे सांगितले.

- Advertisement -

पीटीआयच्या नेतृत्वाखाली देशाची चार वर्षांत दुर्दशा झाली, पण तो आता बाहेर आला आहे. पुढील 12 वर्षे सत्तेत राहण्याची योजना या पाच जणांनी आखली होती. तसे झाले असते तर देशाची काय अवस्था झाली असती, याचा विचार करा. या लोकांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. देशात एकामागून एक आत्मघातकी हल्ले होत आहेत, असे त्या म्हणाल्या.

या पाच जणांनी दिवसरात्र देशाला लुटले आहे. कुणी हिऱ्याच्या अंगठ्या घेत आहेत, कुणी प्लॉट घेत आहेत, कुणी जमिनीच्या माध्यमातून कमाई करत आहेत, कुणी दुबईला पैसे पाठवत आहेत. या लुटीपासून देशाला वाचवण्याची जबाबदारी पीएमएल-एनची आहे, असेही मरियम नवाझ म्हणाल्या.

- Advertisement -

इम्रान खान यांच्यावर थेट आरोप
देशातील वाढते दहशतवादी हल्ले आणि नुकताच पेशावरमध्ये झालेला हल्ला यावरून मरियम यांनी इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला. इम्रान खान सत्तेवर आल्यानंतर दहशतवादाने पुन्हा डोके वर काढल्याचा आरोप त्यांनी केला. पाकिस्तानच्या आयएसएआय या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख फैझ हमीद हे इम्रान खान यांचे डोळे, कान आणि नाक आहेत आणि त्यांनीच तो खैबर पख्तूनख्वामध्ये तैनात असताना दहशतवाद्यांसाठी पाकिस्तानचे दरवाजे उघडले होते, असे सांगत पेशावरच्या दहशवादी हल्ल्याला फैझ हामिद यांना त्यांनी दोषी ठरविले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -