घरदेश-विदेश१३ हत्यांसह, ३० हून अधिक गंभीर गुन्हे करणाऱ्या नक्षलवादी जोडप्याचं आत्मसमर्पण, दोघांवरही...

१३ हत्यांसह, ३० हून अधिक गंभीर गुन्हे करणाऱ्या नक्षलवादी जोडप्याचं आत्मसमर्पण, दोघांवरही होते ८ लाखांचे बक्षीस

Subscribe

गडचिरोलीत तब्बल १३ हत्या, ३० हून अधिक गंभीर गुन्हे नावावर असणाऱ्या एका जहाल नक्षलवादी जोडप्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. या जहाल नक्षलवादी जोडप्याचे नाव विनोद ऊर्फ मनिराम नरसू बोगा (३२) आणि पत्नी कविता ऊर्फ सत्तो हरिसिंग कोवासी असे आहे. या दोघांनी आज पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.

विनोद बोगा हा कोरची दलममध्ये एरिया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर दलम डॉक्टर म्हणून नोकरी करत होता. तर त्याची पत्नी कविता कोवाची पार्टी मेंबर या पदावर टिपागड दलममध्ये कार्यरत होती. विनोदवर खुनाचे १३, चकमकीचे २१, जाळपोळीचा १ व इतर ५ गुन्हे दाखल आहेत, तर कवितावर चकमकीचे ५, जाळपोळीचा १ आणि इतर ३ गुन्हे दाखल आहेत. यामुळे शासनाने विनोद बोगा याच्यावर ६ लाख रुपयाचे तर कविता कोवाची हिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

- Advertisement -
Naxal couple with Rs 8 lakh bounty surrenders in Gadchiroli
Naxal couple with Rs 8 lakh bounty surrenders in Gadchiroli

उल्लेखनीय बाब म्हणजे गडचिरोली पोलीस दलाने राबवलेल्या नक्षलवादी विरोधी शोध मोहिम २०१९ ते २०२१ दरम्यान ४३ नक्षलवाद्यांनी आत्मसर्पण केले आहे. यात ४ डीव्हीसी, २ दलम कमांडर, ३ उपकमांडर, ३३ सदस्य आणि १ जनमिलिशिया यांचा समावेश आहे. आतापर्यंत ६४७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

यात मार्च २०२१ दरम्यान २२ लाखांचे बक्षीस लावलेल्या ४ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. यामध्ये ३ पुरुष आणि १ महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे. आत्मसमर्पण केलेल्या चारही नक्षलवाद्यांविरोधात खून, जाळपोळ, चकमक असे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. अशी माहिती गडचिरोलीच्या जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -