घरदेश-विदेशछत्तीसगडच्या नारायणपूरमधील नक्षलवाद्यांच्या IED स्फोटात 1 जवान शहीद, 1 जखमी

छत्तीसगडच्या नारायणपूरमधील नक्षलवाद्यांच्या IED स्फोटात 1 जवान शहीद, 1 जखमी

Subscribe

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या IED बॉम्बस्फोटात एक जवान शहीद झाला आहे . त्याचवेळी एक तरुण जवान गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. ITBP 53 बटालियनची टीम रस्ते बांधकामाच्या संरक्षणासाठी गस्तीवर निघाली होती, त्यावेळी सकाळी 8.30 च्या सुमारास हा स्फोट घडवण्यात आला. राजेंद्र सिंह असे शहीद जवानाचे नाव आहे तर महेश लक्ष्मण असे जखमी जवानाचे नाव आहे. छत्तीगडच्या सोनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोंडरीबेडाजवळ ही घटना घडली आहे.

- Advertisement -

नारायणपूरचे एसपी सदानंद कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ITBP 53 बटालियनचे जवान रस्ते बांधकामाच्या संरक्षणासाठी बाहेर पडले, मात्र सोनापूर पोलीस ठाण्याच्या धोंडरीबेडा येथे जवान पोहचताच नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटांचा भीषण स्फोट झाला. ज्यात एक जवान शहीद झाला तर दुसरा जवान जखमी झाला. त्यांना उपचारांसाठी आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जखमी जवानाला चांगल्या उपचारांसाठी रायपूरला एअरलिफ्ट केले जाईल अशी माहिती नारायणपूरचे एसपी सदानंद कुमार यांनी दिली आहे.  त्यानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम वाढवण्यात आली आहे.


Canada Accident: रस्ते अपघातात ५ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -