घरदेश-विदेशNaxalite Attack : छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर नक्षवाद्यांचा हल्ला, चकमकीत तीन जवान शहीद

Naxalite Attack : छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर नक्षवाद्यांचा हल्ला, चकमकीत तीन जवान शहीद

Subscribe

रायपूर : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या टेकुलागुडेम गावात नव्याने स्थापन केलेल्या सुरक्षा छावणीवर आज (ता. 30 जानेवारी) नक्षलावाद्यांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले असून नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 14 पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जवान सुकमा जिल्ह्यात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या गस्त घालणाऱ्या छावणीतील जवानांवर हल्ला करण्यात आला, ती छावणी स्थानिक जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली होती. (Naxalite attack on CRPF camp in Chhattisgarh, three jawans martyred in encounter)

हेही वाचा… Chandigarh : विनोद तावडेंनी आणखी एक मोहिम केली फत्ते; चंदीगड महापौर निवडणुकीनंतर राज्यसभेची चर्चा रंगली

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, नक्षल कारवायांवर अंकुश ठेवता यावा यासाठी, विजापूर-सुकमा सीमेवरील टेकुलागुडेम या गावात आज नवीन सुरक्षा छावणीची स्थापना करण्यात आली. यामुळे परिसरातील लोकांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळणार आहे. परंतु, या छावणीच्या स्थापनेनंतर माओवाद्यांनी जोनागुडा-अलिगुडा भागात नक्षलविरोधी कारवाया करत असताना CoBRA/STF/DRG दलावर गोळीबार केला. चकमकीनंतर सर्व नक्षलवादी जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरले. यानंतर 14 जखमी सुरक्षा कर्मचाऱ्यांना उपचारांसाठी एअरलिफ्ट करून रायपूरला नेण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून पोलीस आणि नक्षलावादी यांच्या चकमकीत वाढ झाली आहे. सन 2021 साली टेकलगुडेम जंगलात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 23 जवान शहीद झाले होते. एप्रिल 2021 मध्ये, सुमारे 2 हजार सुरक्षा कर्मचारी विजापूर जिल्ह्यात एका नक्षलवादी नेत्याचा शोध घेत होते. तेव्हा त्यांच्यापैकी काहींवर हल्ला झाला होता. सुमारे 400 ते 750 प्रशिक्षित नक्षलवाद्यांनी सैनिकांना तीन बाजूंनी घेरले आणि अनेक तास त्यांच्यावर मशीन गनने गोळीबार केला. त्यांनी प्राण गमावलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची शस्त्रे, दारुगोळा, गणवेश आणि बूटही लुटले. त्यावेळी CRPF च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत सुमारे 28-30 नक्षलवादीही मारले गेले. त्यामुळे आता नक्षलवाद्यांचे वाढते हल्ले पाहता पुढील तीन वर्षांत माओवाद्यांना संपविले पाहिजे, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये डाव्या विचारसरणीवर (LWE) सर्व संबंधितांशी आढावा बैठकीत केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -