घरदेश-विदेशNaxalite Encounter : निवडणुकीच्या रणधुमाळीत नक्षलवादी आणि सुरक्षादलात चकमक

Naxalite Encounter : निवडणुकीच्या रणधुमाळीत नक्षलवादी आणि सुरक्षादलात चकमक

Subscribe

देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामुळे सुरक्षा व्यवस्था आता अलर्ट मोडवर आली आहे. अशातच आता छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षादलाच्या जवानांमध्ये सकाळी चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे.

छत्तीसगड : देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामुळे सुरक्षा व्यवस्था आता अलर्ट मोडवर आली आहे. अशातच आता छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षादलाच्या जवानांमध्ये सकाळी चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत आतापर्यंत आठ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले असून घटनास्थळावरुन मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. (Naxalite Encounter: Clash between Naxalite and security forces in election battleground)

हेही वाचा… Ramdev Baba : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवरून रामदेव बाबा यांनी स्वत: मागितली सुप्रीम कोर्टाची माफी

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गंगालूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरात, एसटीएफ, कोबरा आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाकडून सर्च मोहीम राबविण्यात येत होती. 01 एप्रिलच्या रात्री छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही शोध मोहीम सुरू होती. परंतु, आज मंगळवारी (ता. 02 एप्रिल) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गंगालूर पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या कोरचोली परिसरातील जंगलात सुरक्षादलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात अचानक चकमक सुरू झाली. या चकमकीत 8 नक्षलवादी ठार झाले आहेत, तर काहीजण जखमी झाले आहेत.

निवडणुकीच्या रणधुमाळीत ही शोध मोहीम सुरू असताना सुरक्षा जवान लेंड्रा गावातील जंगलात पोहोचले. यावेळी जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केला. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी सुद्धा प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. या कारवाईत आठ नक्षलवादी ठार झाले आहेत. काही वेळाने नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला. मग सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळाची तपासणी केली असता 8 नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. तसेच घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा सुद्धा जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

सुरक्षादलाच्या जवानांनी घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. यामध्ये एलएमजी ऑटोमेटिक लॉन्चर, बीजीएल लॉन्चर आणि इतर शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईत जिल्हा रिझर्व्ह गार्ड (डीआरजी), विशेष कार्य दल (एसटीएफ) आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या कोबरा बटालियनचे जवान सहभागी होते. या सर्वांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -