घरताज्या घडामोडीगडचिरोलीतील अबुझमाड जंगलात पोलिसांची मोठी कारवाई; एका नक्षलवाद्याला कंठस्नान

गडचिरोलीतील अबुझमाड जंगलात पोलिसांची मोठी कारवाई; एका नक्षलवाद्याला कंठस्नान

Subscribe

गुडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात नक्षलविरोधी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत नक्षलविरोधी पोलीसांनी एका नक्षलवाद्याला कंठस्नान घातल्याची माहिती समोर येत आहे.

गुडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात नक्षलविरोधी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत नक्षलविरोधी पोलीसांनी एका नक्षलवाद्याला कंठस्नान घातल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी सकाळपासून ऑपरेशनवर निघालेले नक्षलविरोधी पोलीस पथकाच्या तुकड्या भामरागड तालुक्यातील अबुझमाड जंगल परिसरात दाखल झाल्या. त्यावेळी सकाळी 10 वाजताच्या सुमारास चकमक सुरू झाली आणि त्यामुळे एका नक्षलवादाला कंटस्थान घालण्यात पोलिसांना यश आले. (Naxalites killed by police in Gadchiroli)

नेमके काय घडलं?

- Advertisement -

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागात भामरागड हे एटापल्ली तालुक्यातील अबुजमाड जंगल परिसर आहे. नक्षलवाघांना लपण्यासाठी किंवा अनेक नक्षलवाद्यांचे दलम याच पहाडीवर वास्तवास असतात. या ठिकाणी सकाळपासून ऑपरेशनवर निघालेले नक्षलविरोधी पोलीस पथकाच्या तुकड्या भामरागड तालुक्यातील अबुझमाड जंगल परिसरात दाखल झाल्या. त्यानंतर जंगलात नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देत पोलीस विभागाने गोळीबार केला. तसेच, या ठिकाणावर नक्षलवाद्यांचा दलम असल्यामुळे काही नक्षल सशस्त्र साठा आणि साहित्य पोलीस विभागाने जप्त केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या भागात छत्तीसगड पोलीस, सीआरपीएफ किंवा नक्षलविरोधी पोलीस पथक सी सिक्सटी गडचिरोलीतर्फे ऑपरेशन राबविण्यात येतात. मोठ्या प्रमाणात नक्षल शस्त्रसाठा पोलीस हस्तगत करतात. याशिवाय, मागील काही वर्षांपूर्वी याच अबुझमाड पहाडीवर नक्षलवादी यांनी शस्त्र साठा तयार करणारा कारखाना तयार केला होता. याला नक्षलविरोधी पोलीस पथक सी सिक्सटीने उद्ध्वस्त केला होता. अशा मोठ्या हल्ल्यांची कारवाई करण्यासाठी सुरक्षित असलेला अबुझमाड पहाड नक्षलवाद्यांच्या नेहमीच केंद्रबिंदू बनलेला आहे.

- Advertisement -

भामरागड हे एटापल्ली तालुक्यातील अबुजमाड जंगल परिसर हा अतिसंवेदशील अति दुर्गम असल्यामुळे नक्षलविरोधी पोलीस पथकांना सेटलाईट फोनच्या माध्यमाने संपर्क करण्यात आला. ऑपरेशन पूर्ण करून नक्षलविरोधी पोलीस पथक हे जिल्हा पोलीस मुख्यालय येथे आज सायंकाळपर्यंत दाखल होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद या संदर्भात आयोजित करण्यात आली आहे.


हेही वाचा – उद्योगपती अदानींच्या अडचणीत वाढ; आता मार्केट नियामक SEBI करणार चौकशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -