Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नक्षलवाद्यांच्या तावडीतील CRPF जवानाची ६ दिवसांनंतर सुटका

नक्षलवाद्यांच्या तावडीतील CRPF जवानाची ६ दिवसांनंतर सुटका

जवानाच्या परिवारात आनंदाचे वातावरण

Related Story

- Advertisement -

नक्षलवाद्यांनी ६ दिवसांपूर्वी राज्या राखीव दलाच्या कोब्रा जवानाचे अपहरण केले होते. या जवानाची सुखरुप सुटका करण्यामध्ये स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना यश आले आहे. या जवानाची सुटका झाली असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांनी दिली आहे. बस्तर भागातील बासागुडा येथील सुरक्षा शिबीरामध्ये नेण्यात आले होते. जवानाची सुटका झाल्यानंतर वेद्यकीय तपासणी करण्यात आली असून आशक्तपणा आणि डिहाइड्रेशनवरील उपचार केले. टेकलगुडेममध्ये नक्षवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये कोबराच्या २१०व्या तुकडीमधील जवान राकेश्वर सिंह मनहासचे अपहरण नक्षलवाद्यांनी केली आहे.

राकेश्वर सिंह मानहास हा जवान सीआरपीएफच्या कोब्रा २१० बटालियनमधला सदस्य आहे. ६ दिवसांपूर्वी नक्षलवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुकमा बिजापूरच्या सीमेजवळ चकमक झाली. या चकमकीमध्ये जवान बेपत्ता झाला होता. यानंत या जवानाचे अपहरण केल्याचे नक्षलवाद्यांनी एका पत्राद्वारे सांगितले.

- Advertisement -

जवानाची सुटका करण्यासाठी नक्षलवाद्यांसोबत मध्यस्थी करण्यासाठी एका समिती गठीत करण्यात आली होती. मध्यस्थामार्फत संवाद साधून जवानाची सुटका करण्यामध्ये यश आले आहे. संपूर्ण गावासमोर जवानाची सुटका करण्यात आली. जवानाची सुटका करण्यासाठी या ही टीम जंगलात गेली होती यावेळी त्यांच्यासोबत ७ पत्रकारांची टीमही गेली होती.

परिवारात आनंदाचे वातावरण

कोबरा जवानाची सुखरुप सुटका झाल्यानंतर त्याच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण होते. मागील काही दिवसांपासून परिवारातील सर्वजण जवानाच्या काळजीने व्याकूळ झाले होते. तसेच जवानाच्या पत्नीला पती पुन्हा घरी नक्कीच सुखरुप येईल याची खात्रीही होती. आपल्या मुलाची सुखरुप सुटका केल्यामुळे जवान राकेश्वरच्या आईने मोदी सरकारचे आभार मानले आहेत.

- Advertisement -