NEET परीक्षांबद्दल व्हायरल झालेले ‘ते पत्र’ खोटे, विद्यार्थ्यांनो लक्ष ठेवा

NBE has clarified that the letter that went viral about NEET exams was false.
NBE has clarified that the letter that went viral about NEET exams was false.

शोशल मीडियावर NEET परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल एक पत्र व्हायरल केले जात आहे. यामुळे NEET परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे NBT ने सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे पत्र खाटे असून परीक्षा ठरलेल्या तारखेला होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, NEET परीक्षा ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्याने केली जात आहे.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने नोटीस जारी करत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बनावट नोटीसबाबत स्पष्टीकरण दिले आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन natboard.edu.in वरील अधिकृत वेबसाईटवरच त्याच्या NEET परीक्षे संबंधित सूचना जारी करते. विद्यार्थ्यांना NBEMS संबंधित कोणतीही माहिती फक्त वेबसाइटवर तपासण्याचे आम्ही आवाहन करतो, असे NBE ने म्हटले आहे. यावेळी त्यानी अशा बनावट नोटिसांवर विश्वास ठेवू नका आणि अशा कोणत्याही नोटीसने दिशाभूल करू नका. NBEMS बद्दलची कोणतीही माहिती त्यांच्या वेबसाइटवरून तपासल्यानंतरच विश्वास ठेवा, असे म्हटले असून कोणत्याही प्रश्नासाठी, NBEMS उमेदवार केअर सपोर्टशी 011-45593000 वर संपर्क साधा किंवा NBEMS च्या कम्युनिकेशन वेब पोर्टल  exam.natboard.edu.in/communication ला भेट देऊन अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.

 

विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग अजूनही 5,000 इंटर्नची अपात्रता आणि अपर्याप्ततेचे कारण देत NEET PG 2022 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहे. ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशनने देखील NEET PG 2022 परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.