पाकिस्तानी बोटीतील हेरॉईन जप्त प्रकरणाचे दिल्ली ते यूपी कनेक्शन; NCB कडून चौकशी सुरु

भारतीय तटरक्षक दलाने 24 एप्रिल रोजी एका पाकिस्तानी बोटीतून 280 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आणि नऊ क्रू सदस्यांना अटक केली.

ncb active in 280 crore heroin case recovered from pakistani boat delhi up connection probe begins
पाकिस्तानी बोटीतील हेरॉईन जप्त प्रकरणाचे दिल्ली-यूपी कनेक्शनच; NCB कडून चौकशी सुरु

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने 24 एप्रिल रोजी राज्याच्या किनार्‍याजवळील अरबी समुद्रात एका पाकिस्तानी बोटीसह नऊ क्रू सदस्यांना पकडले. या बोटीतून 280 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. आता या प्रकरणाचे दिल्ली ते उत्तर प्रदेश कनेक्शन समोर आले आहे. त्यामुळे सीबीआयने आता या प्रकरणाची कसून चौकशी सुरु केली आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो या ड्रग्ज प्रकरणात अफगाणिस्तान, पाकिस्तान, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश या देशांच्या कनेक्शनची बारकाईने चौकशी करत आहे. त्यामुळे प्रकरणात लवकरच मोठी कायदेशीर कारवाई होऊ शकते.

केंद्रीय अन्वेषण यंत्रणा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (Gujarat ATS) केलेल्या संयुक्त कारवाईत 4 जणांना अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानसह काळ्या अमली पदार्थांच्या व्यवसायाशी संबंधित एका मोठ्या टोळीशी त्याचे मजबूत संबंध आहेत. दरम्यान 3 दिवसांपूर्वी भारतीय तटरक्षक दलाने आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेपासून 14 नॉटिकल मैल भारतीय सीमेमध्ये ‘अल हज’ नावाची पाकिस्तानी बोट पकडली होती. या पाकिस्तानी बोटीची झडती घेतली असता यातून सुमारे 56 किलो उच्च दर्जाचे हेरॉईन सापडले, ज्याची बाजारातील किंमत अंदाजे 280 कोटी इतकी आहे.

अटक केल्या प्रमुख आरोपींची नावे

1. राजी हैदर अली- ओखला विहार स्थित जामिया नगर, दिल्लीचा रहिवासी.

2. अवतार सिंह सन्नी- लाजपत नगर, दिल्लीचा रहिवासी.

3. अब्दुल राब कडक- लाजपत नगर, दिल्लीचा रहिवासी.

4. इम्रान आमिर- मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेशचा रहिवासी.

या आरोपींनी प्रामुख्याने एनसीबीच्या दिल्ली युनिट आणि गुजरात एटीएसच्या पथकाने अटक केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकणाच्या आतापर्यंत तपासात मुख्य आरोपी म्हणून अब्दुल राब याचे नाव समोर आले असून तो मूळचा अफगाणिस्तानातील कंदहार भागातील आहे. अब्दुलच्या अटकेनंतर त्याचे भारत आणि अफगाणिस्तानमधील कनेक्शन तपासण्याचे काम सुरू आहे. एनसीबीचे एक पथक उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये तपास करत आहे. कारण आरोपी राजी हैदरच्या कारखान्यातून जवळपास 35 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.

मुझफ्फरनगरसह उत्तर प्रदेशातील कोणत्या भागात त्याचे नेटवर्क आहेत, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. एनसीबीने उत्तर प्रदेशमध्ये ड्रग कनेक्शनच्या मुद्द्यावर स्वतंत्र एफआयआर नोंदवला आहे. एनसीबीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान, पाकिस्तान ते उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी या ड्रग्ज प्रकरणाचा संबंध अतिशय काळजीपूर्वक तपासला जात आहे. याबाबत लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

विशेष म्हणजे भारतीय तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने 25 एप्रिल रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानी बोट ‘अल हज’ भारतीय पाण्यात घुसल्यावर तिला चेतावणी देण्यात आली आणि पकडण्यात आली. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी बोटीतून 280 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. गुजरात एटीएसला पाकिस्तानातून ड्रग्ज आणल्याची माहिती मिळाल्याने भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने सीमेपलीकडून येणाऱ्या बोटीला पकडण्यासाठी संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली.


मुंबईच्या सुरक्षिततेसाठी एकच प्राधिकरण; पुढील ५० वर्षांचे नियोजन आवश्यक – आदित्य ठाकरे