अमेरिका- ब्रिटनमध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, भारताने घाबरण्याचे कारण आहे का?

भारतातील विशिष्ट प्रकारच्या व्हेरिएंटवर त्याचा कसा परिणाम होत आहे, यावर गांभीर्याने लक्ष ठेवले पाहिजे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे

Coronavirus

भारतात कोरोना संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. चांगली गोष्ट म्हणजे यावेळी कोरोनाची तीव्रता आणि आजारामुळे रुग्णालयात पोहोचण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे. मात्र सरकार याबाबत अधिक दक्ष असून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. या परिस्थितीवर सोमवारी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे संचालक डॉ. सुरजित सिंग म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या तीव्रतेवर आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. (ncdc director said we are looking particular covid cases which are reporting in us uk)

डॉ. सुरजित सिंग म्हणाले की, भारतात आत्तापर्यंत कोरोनाचा कोणताही नवा व्हेरिएंट आढळून आलेला नाही. सध्या कोरोनाचा एका नवा व्हेरिएंट समोर येत असून त्याचा शोध घेतला जात आहे. हा व्हेरिएंट यूएस, यूके आणि इतर देशांमध्येही काही विशिष्ट प्रकरणांमध्ये आढळून आला आहे. याशिवाय कोरोनाग्रस्तांची स्थिती आणि रुग्णालयाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहोत. या प्रकरणांचा तपास सुरु आहे. यासाठी विशिष्ट नमुन्यांमध्ये कोरोनाचे काही नवीन प्रकार आहेत का याचा शोध सुरु आहे. मात्र आत्तापर्यंत कोणताही व्हेरिएंट समोर आलेला नाही.

डॉ. सुरजीत पुढे म्हणाले की, अशाप्रकारे आम्ही कोरोनाच्या सर्व प्रकरणांवर लक्ष ठेवून आहोत. यात आत्तापर्यंत कोणतेही खास केस आढळून आली नाही ज्याच Omicron व्यतिरिक्त नवीन व्हेरिएंट आढळून आला असेल. आत्तापर्यंत आढळून आलेले व्हेरिएंट हे ओमिक्रॉनचे सब व्हेरिएंट होते. देशातील 396 सेंटिनल साइटवरून पाठवलेल्या सॅपलच्या जीनोम सिक्वेंसची तपासणी सुरू आहे. Omicron च्या BA.2 सब-व्हेरियंटने इतर सर्व व्हेरिएंटची जागा घेतली आहे. परंतु त्याचे संक्रमण आणि तीव्रता भिन्न आहे. भारतातील विशिष्ट प्रकारच्या व्हेरिएंटवर त्याचा कसा परिणाम होत आहे, यावर गांभीर्याने लक्ष ठेवले पाहिजे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.


सोनिया गांधींच्या स्वीय सचिवावर बलात्काराचा गुन्हा दाखल