घरदेश-विदेशये AU AU कौन है? विरोधकांचा खोचक प्रश्न; त्याला अजित पवारांचे चोख...

ये AU AU कौन है? विरोधकांचा खोचक प्रश्न; त्याला अजित पवारांचे चोख प्रत्युत्तर, म्हणाले…

Subscribe

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस चांगलाच गाजला, यात वेगवेगळ्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद, रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण, आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून विरोध आणि सत्ताधारी आमने सामने आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीकास्त्र डागण्यात आले, यात दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून चांगलाच वादंग पाहायला मिळाला. यावेळी रिया चक्रवर्तीच्या फोनवर AU नावाच्या नंबरवरून 44 फोन कॉल्स आल्याचा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला. ज्याचे पडसाद महाराष्ट्र विधिमंडळातही उमटले. आमदार नितेश राणे यांनी तर AU चा मुद्दा उचलून धरत आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांवर गंभीर टीका केली. सत्ताधाऱ्यांच्या या टीकेला आता विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तर देत टीकाकारांना AU चा स्पष्ट अर्थ समजून सांगितला आहे.

AU या शब्दाचा अर्थ काय म्हणत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी ठाकरे कुटुंबियांवर बोट दाखवले. अजित पवार यांनी विधानसभेच्या सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना AU चा अर्थ स्पष्ट केला आहे. अजित पवार यांनी यात रिया चक्रवर्तीचा संदर्भ दिला आहे. रियाने दिलेल्या माहितीनुसार, स्पष्टीकरणानुसार एयु म्हणजे अनन्या उदास असा त्याचा अर्थ आहे. विनाकारण कुणालाही बदनाम करु नये, अशा शब्दात अजित पवार यांनी सत्ताधारी आमदारांवर पलटवार केला.

- Advertisement -

रिया चक्रवर्तीला फोन आलेला AU हा नंबर म्हणजे आदित्य ठाकरे यांचा असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, मात्र एक इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वत: रिया चक्रवर्तीनेच AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे नसून अनन्या उदास असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र यावरून विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळाली. याप्रकरणी चौकशीसाठी आता एसआयटी स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावरूनही आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा डाव सुरु आहे.


वादग्रस्त डान्सर गौतमी पाटीलची आता थेट चित्रपटात एन्ट्री


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -