मुंबई – दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार असून अजित दादा गटाने 30 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामुध्ये 13 मुस्लिम चेहऱ्यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीने संधी दिली आहे. दिल्लीमध्ये आप विरुद्ध भाजप अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत असलेल्या अजित पवारांनी दिल्लीत भाजपच्याविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडण्याआधी पक्षाची राष्ट्रीय मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केली होती. महाराष्ट्राशिवाय इतर राज्यांमध्ये पक्षाचे आवश्यक खासदार आणि आपेक्षित मते नसल्यामुळे राष्ट्रवादीची राष्ट्रीय पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली होती. अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळे होत पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने अजित दादांचा पक्षच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचे जाहीर करुन त्यांना गजराचे घड्याळ हे चिन्ह देखील दिले. त्यानंतर अजित पवार गटाने सर्व राज्यांमध्ये पक्ष विस्ताराची घोषणा केली होती. जम्मू-काश्मिर विधानसभा निवडणूकही अजित पवार गटाने लढवली होती. आता दिल्ली विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करत 30 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
अजित पवारांची राष्ट्रवादी भाजप प्रणित एनडीएचा घटकपक्ष आहे. मात्र दिल्ली विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यामुळे पक्षवाढीसाठी अजितदादा राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादी
1) रतन त्यागी – बुरारी
2) मुलायम सिंह – बादली
3) लखन प्रजापती – रिठाळा
4) खेमचंद बासवाल – मंगोलपुरी (एससी राखीव)
5) मोहम्मद उस्मान – शालिमार बाग
6) खालीद उर रेहमान – चांदणी चौक
7) मोहम्मद जावेद – माटिया महल
8) मोहम्मद हारुन – बल्लीमारन
9) सदरे आलम – मोती नगर
10) हरीश कुमार – मदिनापूर (एससी राखीव)
11) मोहम्मद नवीन – जनकपुरी
12) हमीद – विकासपूरी
13) विश्वनाथ अगरवाल – नवी दिल्ली
14) सुरेंद्र सिंह हुड्डा – कस्तुरबा नगर
15) नरेंद्र तन्वर – छतारपूर
16) खेमचंद राजोरा – देवळी
17) कमर अहमद – संगम विहार
18) जमील – कालकाजी
19) प्रेम खताना – तुघलकाबाद
20) इम्रान सैफी – बदरपूर
21) नमहा – लक्ष्मी नगर
22) दानिश अली – कृष्णानगर
23) राजेंद्र पाल – शहादरा
24) अभिषेक – रोहतास
25) मेहक डोग्रा – घोंडा
26) जगदीश भगत – गोकळपूर
27) संजय मिश्रा – करवाल नगर
28) राजेश लोहिया – सीमापुरी
29) शब्बीर खान – हरीनगर
30) मोहम्मद समीर – मलवीय नगर
NCP releases a list of 30 candidates for the upcoming #DelhiElection2025 pic.twitter.com/3QsCAMrgFv
— ANI (@ANI) January 17, 2025