घरदेश-विदेशमोदींच्या हेतूबाबत लोकांच्या मनात शंका नाही; पवारांचा विरोधकांना चकवा

मोदींच्या हेतूबाबत लोकांच्या मनात शंका नाही; पवारांचा विरोधकांना चकवा

Subscribe

राफेल विमानाच्या खरेदीवरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात रान पेटवले असतानाच दुसऱ्या बाजुला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांना क्लिन चीट देऊन टाकली आहे. न्युज १८ लोकमत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतूबाबत लोकांच्या मनात अजूनही शंका नाही”. या शब्दात पवार यांनी मोदी यांची पाठराखण केली आहे. राफेलच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सरकारवर तुटून पडले आहेत. देशाचे पंतप्रधान नसून हे चौकीदार नसून चोर आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्याचा हवाला देऊन केला आहे. मात्र पवारांच्या वक्तव्याने सरकारला घेरण्याच्या विरोधकांच्या मनसुब्यांना चकवा बसला असल्याचे चित्र निर्माण होत आहे.

विरोधकांच्या या मागणीवर मात्र पवारांचे एकमत

पंतप्रधान यांच्यावर शंका घेण्यास पवार यांनी विरोध दर्शविला असला तरी काँग्रेसच्या दुसऱ्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने किंवा अन्य पक्षांनी राफेल विमानांच्या किमंती बाबतीत प्रश्न उपस्थित केलेला आहे. किमंतीच्या बाबतीत माहिती देण्यासाठी सरकारला काही अडचण असू शकत नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

पवार म्हणाले की, “राफेलची खरेदी गोपनीय करार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. पण मी सांगू इच्छितो की, मी सूद्धा संरक्षण मंत्री होतो. गोपनीय करार हा खरेदी केलेल्या सामुग्रीच्या तंत्रज्ञानाच्या बाबतचा असतो, त्या सामुग्रीची किमंत काय? हा काही तंत्रज्ञानाचा विषय असू शकत नाही.”

बोफोर्सचा न्याय राफेलला का नाही

भाजप विरोधात असताना बोफोर्स घोटाळ्यासंबंधी त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले होते. संसदेत आरोप व्हायचे तेव्हा मी देखील संसदेतच होतो. सुषमा स्वराज यांनी बोफोर्सच्या तंत्रज्ञानापासून सर्वच गोष्टींचा तपशील उघडा करावा, अशी मागणी लावून धरली होती. त्यासाठी दिवस-दिवस सभागृह चालून दिले नव्हते. त्यावेळेला त्यांना सर्व माहिती हवी होती, मग आज त्यांनी सर्व माहिती द्यायला काही अडचण नाही, अशी खोचक प्रतिक्रिया पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -