घरताज्या घडामोडीशरद पवार - कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई भेट, पवारांनी ट्विट करत सांगितले...

शरद पवार – कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई भेट, पवारांनी ट्विट करत सांगितले कारण

Subscribe

मुख्यमंत्री बोम्मई यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री तसेच नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत. शरद पवार सध्या बंगळूरु दौऱ्यावर आहेत. बंगळूरु दौऱ्यावर असताना शरद पवार आणि कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात भेट झाली आहे. या भेटीचं कारण शरद पवार यांनी ट्विट करत सांगितले आहे. बसवराज बोम्मई यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. या इच्छेनुसार शरद पवार यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे. तर शरद पवार यांनी मागील काही दिवसांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आहे.

कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करत या भेटीचे फोटो टाकले आहेत. तसेच भेटीमागचे कारणही सांगितले आहे. मी बंगळूरु दौऱ्यावर असताना कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा फोन आला होता. बोम्मई यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या पदाचा मान राखत त्यांच्या भेटीला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची भेट घेतली. त्यांच्या आदरातिथ्याबद्दल मी अभारी असून येत्या काळात दोन्ही राज्य सहकारी दृष्टीनं सोबत काम करतील अशी आशा असल्याचे शरद पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

- Advertisement -

शरद पवार – नरेंद्रम मोदी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली होती. या भेटीमध्ये राजकीय मुद्द्यावर चर्चा झाली होती. शरद पवार आणि मोदी यांच्यात तासभर चर्चा झाली होती. राज्यातील तसेच देशातील राजकीय विषयांवर आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी मोदींशी चर्चा केली होती.

- Advertisement -

शरद पवार -अमित शाह भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रि मंडळ विस्तारात नव्या खात्याची निर्मिती करण्यात आली आहे. ते म्हणजे सहकार खातं या खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देण्यात आली आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेऊन सहकार खात्याविषयी चर्चा केली आहे. सहकार क्षेत्रातील समस्यांमध्ये तातडीने लक्ष घालून सहकार मंत्री त्या सोडवण्यासाठी पावलं उचलतील, या भेटीदरम्यान देशातील साखर उद्योगाची परिस्थिती आणि साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर चर्चा केली असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी शरद पवार दिल्लीत आहेत. यामुळे दिल्लीत अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षनेत्यांची आणि शरद पवार यांची भेट झाली आहे.. सध्या शरद पवार बंगळूरू दौऱ्यावर आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -