शरद पवारांची पंतप्रधान मोदींच्या आईची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना; पत्र पाठवत म्हणाले…

ncp leader sharad pawar letter to pm modi and prays for his mothers health to improve

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मोदी स्वत: काल त्यांना भेटण्यासाठी गेले होते. देशभरातील अनेक नेतेमंडळी मोदींना कॉल करुन किंवा पत्राच्या माध्यमातून आईच्या तब्येतीची चौकशी करत आहेत. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मोदींना पत्र पाठवत मातोश्री हिराबेन मोदी यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. तसेच त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थनाही केली आहे.

शरद पवार यांनी पत्रात म्हटलं की, तुमच्या मातोश्रींना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुम्ही काल रुग्णालयात जाऊन त्यांची भेटही घेतली. त्यांची प्रकृती स्थिर असून त्या बऱ्या होत आहेत हे समजल्यावर मला दिलासा मिळाला आहे. मला माहित आहे की, तुमचे तुमच्या प्रिय आईशी किती जवळचे नाते आहे हे मला माहीत आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील या कठीण प्रसंगाबद्दल मला जाणीव आहे.

आई ही पृथ्वीवरील सर्वात शुद्ध आत्मा आहे. तुमची आई तुमच्या जीवनाला आकार देणारी शक्ती आणि सतत वाहणारा ऊर्जेचा स्त्रोत आहे. त्यामुळे लवकरात लवकरचं तुमच्या आईच्या प्रकृती सुधारणा व्हावी अशा माझ्या शुभेच्छा आहेत.

मोदींच्या आई हिराबेन मोदी यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने काल अहमदाबादमखील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आणि इतर मान्यवरांनी कालपासून हॉस्पीटलला भेट देत मोदींच्या आई हिराबेन यांच्या प्रकृतीची चौकशी केली, दरम्यान यूएन मेहता हॉस्पीटलनेनंतर एक बुलेटिन जारी करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.


आधार देतायत की गाढतायत यावर विचार करा, शिंदे गटातील मंत्र्यांना उद्धव ठाकरेंचा सल्ला