घरताज्या घडामोडीनवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, हस्तक्षेपास नकार

नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, हस्तक्षेपास नकार

Subscribe

ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी संबंधित व्यक्तींबरोबर आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. मलिक यांनी तात्काळ सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका केली. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी करण्याची तयारी दर्शवली. पण आता मात्र न्यायालयाने याप्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

- Advertisement -

मनी लॉंड्रींगप्रकरणी ईडीने मलिक यांना २३ फेब्रुवारीला अटक केली होती. मलिक यांचे दाऊदच्या संबंधित व्यक्तींबरोबर आर्थिक गैरव्यवहार असल्याचा ईडीचा आरोप होता. त्यानंतर दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ईडीने ताब्यात घेत त्याची चौकशी केली. चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले. यात दाऊदच्या माणसाशी संबंधित असलेल्या कंपनीबरोबर मलिक यांचा संबंध असल्याचे तपासात आढळले. त्यानंतर ईडीने मलिक यांना अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -