घरताज्या घडामोडीचर्चेशिवाय घाईत कृषी कायदे मंजूर केले; शरद पवारांचा केंद्रावर निशाणा

चर्चेशिवाय घाईत कृषी कायदे मंजूर केले; शरद पवारांचा केंद्रावर निशाणा

Subscribe

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मोदींना सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यावरुन केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्राने चर्चोशिवाय कृषी कायदे मंजूर केल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. तसेच घाईत कृषी कायदे मंजूर करण्यात आल्याचे शरद पवार म्हणाले. यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा सल्लासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला दिला आहे. शरद पवार यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी आणि सीपीआयचे सचिव सीताराम येचूरी यांच्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत कृषी कायद्यांवर चर्चा केली.

शरद पवार यांनी कृषी कायद्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्राने चर्चोशिवाय घाईत कृषी कायदे मंजूर केल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. “शेतकऱ्यांच्या कृषी कायद्यांसंबंधीतच्या मागण्या आहेत. ही तीन कृषी कायद्यांसंदर्भात संसदेत जी बिले आली. त्यावेळी सगळ्यांच्यावतीने सांगण्यात आले की घाईघाईने एवढे महत्त्वाचे, चर्चा न करता तीन कायदे आता मंजूर करुन घ्याल. मात्र, नंतर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही असे घाईने कायदे मंजूर करुन घेऊ नका. मात्र, विरोधकांची सूचनांना न जुमानता १५-१५ मिनिटांत कायदे मंजूर करुन घेतले. आज त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करत असाल तर हे कायदे मागे घ्या आणि नंतर तुम्ही चर्चेला बसून मार्ग काढा. मात्र, केंद्र सरकारची भूमिका अनुकूल दिसत नाही. त्यामुळ हा संघर्ष अजून दिवस चालेल, अशी चिन्ह आहेत,” असे शरद पवार म्हणाले. शेतकरी आंदोलन मागे घेण्यासाठी कृषी कायदे मागे घेणे हाच तोडगा आहे, असे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – कृषी कायद्यांविरोधात शेतकरी सुप्रीम कोर्टात; सोशल डिस्टन्स न पाळल्यामुळे शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -