घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३"धर्म आणि जातीचे राजकारण जनतेला आवडत नाही", शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

“धर्म आणि जातीचे राजकारण जनतेला आवडत नाही”, शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

Subscribe

"सत्तेचा गैरवापर केल्याने भाजपचा दारून पराभव झाला", अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक विधानसभा निकालानंतर दिली आहे.

मुंबई | “धर्म आणि जातीचे राजकारण जनतेला आवडत नाही”, असा टोला विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लगावला.  कर्नाटक विधानसभा निकालानंतर (Karnataka Election Results 2023) शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. कर्नाटकात काँग्रेस (Congress) विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत तर, भाजपचा ( BJP) परावभ होत असल्याचे दिसत आहे.

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने स्थानिक मुद्दे मांडले तर, दुसरीकडे पंतप्रधानांनी बजरंग बली की जय, अशा घोषणा दिली होत्या, पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, “तुम्ही धर्म आणि जात वापरण्याचा प्रयत्न केला. यात एखाद्या वेळी सुरुवातीला यश येते. पण, लोकांना हे आवडत नाही. बजरंग बलीचा मुद्दा निवडणुकीत काढण्याचे काही कारण नव्हते. प्रधानमंत्री असो, आम्ही संसदेत धर्मनिरपेक्षतेवर आमची निष्ठा आहे, अशी शपथ घेतली असताना बजरंग बली की जय अशा घोषणा करणे माझ्या मते हे महत्त्वाच्या व्यक्तीला शोभत नाही. हे काम पंतप्रधानांनी केले आणि कर्नाटकाच्या जनतेने त्यांचे उत्तर दिले.”

- Advertisement -

काँग्रेसने जाहीरनाम्याची घोषणा करताना काय म्हणाले

कर्नाटकात काँग्रेसची सरकार आल्यानंतर बजरंग दलावर बंदी (Bajrang Dal) घालण्याचे आश्वासन त्यांनी त्यांच्या जाहरीनाम्यातून दिली आहे. काँग्रेस बजरंग दलाची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या कट्टरपंथी संघटनेशी केली आहे. ज्या संघटना समाजामध्ये जाती आणि धर्माचे द्वेष पसरवण्याचे काम करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. काँग्रेसचे सरकार आल्यावर त्या कट्टरपंथी संघटनांवर बंदी घालण्यात येईल. बजरंग दल आणि पीएफआय या संघटना परस्पर शत्रुत्व आणि द्वेषभावना वाढवितात. या संघटनांवर बंदी घालून कारवाई केली जाईल, असे काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यातून नमूद केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध; ‘ही’ आहेत महत्त्वाची आश्वासने

‘ही’ आहेत काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील पाच प्रमुख आश्वासने

  • बजरंग दलावर बंदी घालणार
  • प्रत्येक कुटुंबाला २०० युनिटपर्यंत मोफत वीज
  • प्रत्येक गरीब कुटुंबाला दरमहा १० किलो रेशन
  • कुटुंबातील महिला प्रमुखांला दरमहा २ हजार रुपये देणार
  • युवा निधीच्या माध्यमातून बेरोजगार पदवीधर तरुणांना ३ हजार रुपये व पदविकाधारकांना दीड हजार रुपये देणार

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -